आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CM Directs To Take Steps To Stop Farmers Suicides

अात्महत्या राेखण्यासाठी धाेरण ठरवा, शेतक-यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचे अादेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यातील शेतक-यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी परिणामकारक ठरू शकणारे सर्वंकष धोरण तातडीने तयार करावे, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिले. सर्व विभागीय सचिवांच्या आढावा बैठकीत ते बाेलत हाेते.

राज्यातील शेतक-यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी दोन जिल्ह्यांचे प्रायोगिक तत्त्वावर सर्वेक्षण देखील झाले आहे. राज्यातील अन्य जिल्ह्यांचे देखील टप्प्याटप्प्याने सर्व्हेक्षण करण्यात येऊन यासंदर्भातील धोरण तातडीने तयार करण्यात यावे, अशा सूचना फडणवीस यांनी दिल्या.

राज्यातील १२ हजार प्राथमिक आरोग्य केंद्रांची तपासणी करून त्यामध्ये आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. शासकीय खरेदीचे नियोजन व्यवस्थित होण्यासाठी ऐनवेळी होणारे अनावश्यक खरेदीचे प्रकार टाळले पाहिजेत. आर्थिक वर्षांच्या शेवटी खरेदी बंद व्हावी. तसेच राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये दर करारानुसार होणारी खरेदीही बंद करावी. त्याचबरोबर दरवर्षी ३१ मार्चअखेर ऐन वेळीची खरेदी यापुढे होणार नाही याबाबत सर्व विभागांनी दक्षता घ्यावी, या प्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी वित्त विभागाने मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. नागरिकांना आवश्यक सेवा मिळण्यासाठी प्रत्येक विभागाने परवानग्या कमी करून प्रक्रियेत सुलभता आणण्याचे सादरीकरण पुढील बैठकीत करण्याचे आदेशही त्यांनी दिले. या बैठकीत सामान्य प्रशासन, महसूल, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी, जलसंपदा आदी विभागांचा आढावा घेण्यात आला.