आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cm & Dy.cm May Absent In Modi\'s Function At Nagpur

एनटीपीसी संचांचे लोकार्पण: देशाला 24 तास वीज उपलब्ध करून देणार- नरेंद्र मोदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(नागपूरजवळील मौदा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनटीपीसीच्या दोन संचाचे उद्घाटन केले.)
नागपूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास नागपूर विमानतळावर दाखल झाले. राज्य सरकारच्या वतीने मोदी यांचे सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी राज्यपाल के. शंकरनारायणन, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. दरम्यान, नागपूरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पंतप्रधान दीड तास विमानतळावरच अडकून पडले होते. जोरदार व वादळी पाऊस असल्याने विमानतळावर ठेवण्यात आलेल्या चॉपरला उड्डाण करण्याची एअर ट्रॅफिक कंट्रोलनने परवानगी नाकारली होती. अखेर 4 वाजून 40 मिनिटांनी पावसाचा वेग कमी होताचच चॉपरने मोदींसह सर्व नेते मौद्याकडे रवाना झाले. सायंकाळी 5 च्या सुमारास मौद्यातील एनटीपीसीच्या दोन संचांचं लोकार्पण मोदींच्या हस्ते झाले.
यावेळी बोलताना मोदी म्हणाले, मी आतापर्यंत सर्वात जास्त उद्घाटने पायाभूत सुविधांच्या कामांची केली. त्यातही वीज क्षेत्राची सर्वात जास्त केली. भूटानला गेलो, नेपाळला गेलो तेथेही वीज प्रकल्पाच्या कामांना प्राधान्य दिले. देशातही वीजेचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. सर्व प्रकारची वीज, ऊर्जा उत्पादन करणे माझ्या सरकारचे उद्दिष्ट आहे. येत्या काळात लोकांना 24 तास वीज उपलब्ध करून दिली जाईल. मात्र, वीजेच्या बचतीचीसाठी लोकांनी प्रयत्न करावेत असे आवाहन मोदींनी नागरिकांना केले.
मोदी म्हणाले, तुमच्या शहरात, राज्यात वीज असेल तर उद्योग येतात. उद्योग आले की रोजगार मिळतात. पुढे विकासाचे चक्र सुरु राहते. वीज उपलब्धतेवर विकासाचा वेग ठरतो. देशात जिथून शक्य आहे तेथून वीज उत्पादन करण्याचा विचार आहे. त्यामुळे या प्रकल्पांना प्राधान्य देणार असल्याचे मोदींनी सांगितले.
नागपुरातील मेट्रोच्या भूमिपूजनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सायंकाळी 6 वाजता होत आहे. त्यापूर्वी ते मौदा येथील एनटीपीसी वीज प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत. मोदींचे नागपूरात दुपारी सव्वा तीनच्या सुमारास आगमन झाले. विमानतळावर राज्य सरकारच्यावतीने सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी मोदींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पंतप्रधान ज्या राज्यात कोणत्याही समारंभाला जातात तेथे राज्याचे मुख्यमंत्री एक शिष्टाचार म्हणून उपस्थित राहतात. शिष्टाचार म्हणून मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची ही जुनी परंपरा आहे. मात्र या परंपरेला प्रथमच छेद दिला आज दिला गेला आहे. देशाच्या संसदीय इतिसात एखाद्या मुख्यमंत्र्यांने पंतप्रधानाच्या कार्यक्रमावर असा बहिष्कार टाकण्याची पहिलीच वेळ आहे. मात्र, याला अनेक राजकीय कंगोरे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुढे वाचा व छायाचित्रांच्या माध्यमातून पाहा मोदींच्या दौ-यामुळे नागपूरला छावणीचे स्वरूप...