आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहकारी बॅंका लुटल्याने शेतकरी उद्धवस्त- मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शेतक-यांची कर्जमाफी करावी या मागणीसाठी मागील आठवडाभर पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजात व्यत्यय आणणा-या विरोधकांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार हल्लाबोल केला. ज्या शेतक-यांना कर्जमाफी द्यावी असे तुम्ही पोडतिकडीने सांगता त्यांच्यावर आत्महत्येची वेळ कोणी आणली ते सांगा? सहकारी बॅंका माध्यमातून आपल्या संस्थांची भरभराट केली पण शेतक-यांना काय फायदा झाला त्याची उत्तरे द्या असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2009 ते 2014 या काळात (केंद्र सरकारने संपूर्ण कर्जमाफी केल्यानंतरचा काळ) 9 हजार 614 शेतक-यांनी आत्महत्या का केल्या याचे उत्तर द्या मगच कर्जमाफीची मागणी करा असेही फडणवीसांनी विरोधकांना सुनावले.
विदर्भ-मराठवाड्यात 60 लाख शेतकरी आहेत. मात्र त्यातील 25 लाख शेतक-यांनीच केवळ कर्जे घेतली आहेत. मग राहिलेल्या 35 लाख शेतक-यांचे काय करायचे, त्यांना आपली कोणतेही व्यवस्था कर्ज देत नाही. मागील काळात जी कर्जमाफी झाली त्यातून शेतक-यांना नव्हे तर नेत्यांना व त्यांच्या बॅंकानाच झाला असेही फडणवीस यांनी ठासून सांगितले. यावेळी विरोधकांकडे मुख्यमंत्र्यांचे निवेदन शांतपणे ऐकून घेण्याशिवाय पर्याय नव्हता.

पुढे वाचा, काय काय म्हटले मुख्यमंत्र्यांनी...
- गिरते हैं शहसवार मैदान ए जंग में। वो क्या खाक गिरेंगे जो घुटनो के बल चलते हो- फडणवीसांची विधानसभेत शेरो शायरी
- आघाडी सरकारने शेतकऱ्यांना काय दिलं?वीज,पाणी मिळत नसेल तर त्यांनी जगायचं कसं? सिंचनाला निधी मिळूनही शेतीला पाणी का मिळालं नाही?-फडणवीस
- विदर्भ-मराठव्ड्याच्या शेतकऱ्यांना आतापर्यंत 1188 आणि साधारण 1500 कोटी मिळाले आहेत. जी कर्ज माफी या पुर्वी केली त्यातले फक्त 17 टक्के फायदा शेतकऱ्यांना मिळाली आहे. तर 53 टक्के रक्कमेची कर्जमाफी एकट्या पश्चिम महाराष्ट्राची झाली आहे.
- शेतकऱ्यांवर पुन्हा पुन्हा कर्ज माफी करा अशी वेळ का येते याचं आपण आत्मचिंतन केलं पाहिजे
- जलयुक्त शिवार हे अभियान वसंतराव नाईकांचं होतं, ते नीट राबवलं असतं तर राज्याची अवस्था अशी झाली नसती

- दुबार पेरणीसाठी प्रति हेक्टर रक्कम रु. 1500 या मर्यादेत प्रतिशेतकरी 2 हेक्टरपर्यंत शेतक-यांना बियाणे खरेदीकरीता अर्थसहाय्य देण्याची तरतूद
- राज्यात 86 हजार 657 जलयुक्त शिवाराची कामं पूर्ण झाली आहेत, 4 हजार 347 शेततळी उभारण्यात आली
- कर्जमाफीतून 34 लाख शेतकऱ्यांची फसवणूक, यूपीएच्या कर्जमाफीतून कुणाच्या तुंबड्या भरल्या?
- आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यांमध्ये 619 कोटींची कामं पूर्ण केली
- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचन देण्यासाठी सरकार कटिबद्ध

- कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना आधी पात्र करायला हवं

- शेतीमध्ये गुंतवणूक झाल्याशिवाय शेतकरी सुखी होणार नाही
- दुधाला सुद्धा हमीभाव देणार, लवकरच केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार, दुधाची MRP नियंत्रित/ समान ठेवण्यासाठी कायदेशीर सल्ला घेणार

- जुलै 2014 साली मोदी सरकारने हमीभाव देणार हे घोषित केलं, हमीभाव देण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध

- शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँकांवर गुन्हा

- कर्जमाफीतून 34 लाख शेतकऱ्यांची फसवणूक, यूपीएच्या कर्जमाफीतून कुणाच्या तुंबड्या भरल्या?
- आघाडी सरकारच्या काळात पैसे भरुनही 1 लाख शेतकरी वीज पंपापासून वंचित

- राज्यात दीड लाख शेततळी तीन वर्षांत निर्माण करणार, प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात
- महाराष्ट्र हे सहकारी बँकांचं सर्वात मोठं जाळं असलेलं राज्य होतं. सहकारामुळे शेतकऱ्याला मदतीचा हात मिळत होता. मात्र काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी सरकारने हे जाळं उद्ध्वस्त केलं. उद्ध्वस्त झालेली ही व्यवस्था शेतकऱ्याचा कर्दनकाळ ठरत आहे.
बातम्या आणखी आहेत...