आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CM Fadanvis Commented On Officers About Their Work

काम करा, अन्यथा बदली, मुख्यमंत्र्यांची तंबी, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कामावर नाराजी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल टाकून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रशासकीय अधिकाऱ्यांना मनापासून काम करण्याचे आवाहन केले. याच वेळी त्यांनी ‘काम करा, अन्यथा बदलीसाठी तयार राहा’, अशीही तंबी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. सह्याद्री अतिथीगृह येथे विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची गुरुवारी बैठक बोलावण्यात आली होती. या वेळी राज्यात वेगाने कामे होत नसल्याची खंत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

नवे सरकार आले आहे, याची जाणीव अजूनही प्रशासनाला होत नसल्याचा शेरा याआधी फडणवीस यांनी मारला होता. राज्यातील ७० टक्के जिल्हाधिकारी भाजप सरकारने आखून दिलेल्या मार्गावरून काम करत असले तरी उरलेले जिल्हाधिकारी जुन्या मानसिकतेने काम करत आहेत. यामुळे लोकांची कामे होत नसल्याच्या मुद्द्याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले होते. हाच मुद्दा गुरुवारच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा मांडला आणि आता कामे वेगाने झालीच पाहिजेत, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुनावलेे.
या बैठकीत अधिकाऱ्यांना ‘केआरए’नुसार काम करण्याची आठवणही फडणवीसांनी करून दिली. कामांची वेळ तर पाळली जाणे गरजेचे असून निधीचा वापर वेळेत आणि पारदर्शकपणे होत आहे की नाही, हे अधिकाऱ्यांनी पाहायला हवे. वर्षभरात १ लाख घरे निर्माण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असून यासाठी पंतप्रधानांकडून सूचना मिळाल्या आहेत. पण, या दिशेने काय काम झाले, यासाठी वरिष्ठ अधिकारी पुढाकार घेताना दिसत नसल्याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले हाेते. राज्यात उद्योगांचेही जाळे उभारायचे असून यासाठी सरकार जोरदार प्रयत्न करत आहे. उद्योग उभारणी सुरळीत होण्यासाठी १७ कायद्यांमध्ये लवचिकता आणावी लागणार असून यासाठी अधिकाऱ्यांनी कामाला सुरुवात करावी. याचबरोबर सरकारने राज्य हगणदारीमुक्त करण्याचा निर्णय घेतला असून ग्रामविकास विभागाने यासाठी तातडीने पुढाकार घेण्याची गरज अाहे, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
पुढील स्लाइड्सवर वाचा, महसूल यंत्रणेसंदर्भात काय म्हणाले मुख्यमंत्री