आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई-नाशिक बुलेट ट्रेन सुरू करा, मुख्यमंत्री फडणवीस यांचे पंतप्रधान मोदींना पत्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘केंद्र सरकारच्या मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगळुरू या हायस्पीड म्हणजेच बुलेट ट्रेनच्या हीरक चतुष्कोनाच्या पहिल्या टप्प्यात मुंबई- नाशिक हायस्पीड रेल्वेचे काम सुरू करावे,’ अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदी, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे बुधवारी पत्र पाठवून केली अाहे. तसेच पुणे-नाशिक या नव्या ब्रॉडगेज लाइनलाही परवानगीही अागामी अर्थसंकल्पात द्यावी,अशी विनंतीही रेल्वे मंत्रालयाकडे करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटले आहे की, ‘बुलेट ट्रेनच्या मार्गावर मुंबई, ठाणे, बोईसर ही तीन स्थानके आलेली आहेत. केंद्र सरकार हायस्पीड हीरक चतुष्कोन तयार करत आहे. यात मुंबई-हावडा बुलेट ट्रेन धावणार असून ती नाशिकमार्गे नेता येऊ शकते. यासाठी जपानकडून अर्थसाहाय्य मिळवता येऊ शकते. जपान दौऱ्यावर अापण गेले असता ‘जायका’ने अशा मार्गासाठी कमी दरात कर्ज देण्याची इच्छा व्यक्त केली हाेती. त्यामुळे मुंबई-नाशिक हायस्पीड रेल्वे सुरू करावी आणि २०१६-१७ च्या रेल्वे अर्थसंकल्पात याची घोषणा करावी,’ अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली.

बीड रेल्वेसाठी निधी द्या
नगर-बीड-परळी-वैजनाथ हा २८२६ कोटी रुपयांचा प्रकल्प, वर्धा-यवतमाळ-नांदेड हा एक हजार कोटी रुपयांचा प्रकल्प आणि वडसा-गडचिरोली हा २६८ कोटी रुपयांचा प्रकल्प सुरू अाहे. यासाठी निधी कमी पडत असल्याने रेल्वे अर्थसंकल्पात यासाठी निधी द्यावा आणि लोणंद-फलटण-बारामती ही नवीन लाइन टाकण्याकरिता रेल्वे अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी या पत्रात करण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...