आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर भारतीयांशी करणार मुख्यमंत्री ‘मन की बात’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत वर्चस्व मिळवण्यासाठी भाजप शिवसेनेने कसाेशीने प्रयत्न सुरु केले अाहेत. याचाच एक भाग म्हणून भाजपचे नेते शुक्रवारी गाेरेगावातील एनएसई मैदानावर मुंबईतील उत्तर भारतीय नेत्यांसमवेत संवाद साधण्यासाठी विशेष कार्यक्रम घेत अाहेत. विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही याच मैदानावर पक्षाच्या वर्धापन दिनी शक्तीप्रदर्शन केले हाेते.

भाजपचे प्रदेश मीडिया संयाेजक अाेमप्रकाश चाैहान यांनी सांगिते की, या कार्यक्रमात उत्तर भारतीय लाेकांसमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संवाद साधतील. या मेळाव्याच्या तयारीसाठी १५ दिवसांपासून भाजपचे हिंदी भाषक नेता जयप्रकाश ठाकूर. अार. यू. सिंह अमरजित मिश्र यांनी मुंबईतील सर्व वर्गातील उत्तर भारतीय लाेकांशी संपर्क साधून त्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले अाहे. मुंबई भाजपचे महामंत्री अमरजित मिश्र यांनी सांगितले की, ‘मुख्यमंत्र्यांचा संवाद : बाटी- चाेखा (उत्तर भारतीय खाद्यपदार्थ) के साथ’ असा हा कार्यक्रम असेल. या वेळी मुख्यमंत्री सुमारे दाेन तास उत्तर भारतीय लाेकांशी संवाद साधून अापली ‘मन की बात’ मांडतील तसेच त्यांच्या भावनाही एेकून घेतील.’

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला उत्तर भारतीयांची अाठवण अाल्याचा अाराेप काॅंग्रेसने केला अाहे. या अाराेपाचे खंडन करताना अार. यू. सिंह म्हणाले, ‘यापूर्वीही भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमाेद महाजन यांनी २००४ मध्ये ११०० उत्तर भारतीयांसाेबत संवाद साधला हाेता.
बातम्या आणखी आहेत...