आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cm Fadanvis May Expand His Cabinet Before June End

अाणखी नऊ जणांना मंत्रिपदे; राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- या महिनाअखेरीस राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यावर भाजप, शिवसेना व मित्रपक्षांमध्ये एकमत झाले अाहे. सध्या मंंत्रिमंडळात ३० जणांचा समावेश असून आणखी ९ जणांना संधी देऊन विस्तारित मंत्रिमंडळ अाकाराला येण्याची शक्यता अाहे. तसेच ३३ महामंडळांवरील बहुप्रतीक्षित नियुक्त्यांनाही याच दरम्यान ‘मुहूर्त’ लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

३१ आॅक्टोबर २०१४ रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली अाणि भाजपचे सरकार सत्तेवर अाले. मंत्रिपदावरून वाद झाल्याने शिवसेना सुरुवातीला सरकारमध्ये सहभागी नव्हती. मात्र, नंतर युतीत ‘समन्वय’ झाल्यामुळे ५ िडसेंबर २०१४ राेजी शिवसेनेसह मंत्रिमंडळ विस्तार करण्यात अाला. त्या वेळी शिवसेनेकडे दहा, तर भाजपकडे वीस मंत्रिपदे अाली. शिवसेनेच्या दहा मंत्र्यांमध्ये पाच कॅबिनेट, तर पाच राज्यमंत्र्यांचा समावेश होता. दरम्यान, शिवसेना- भाजपच्या वादात महायुतीतील छाेटे घटक पक्ष मात्र ‘लाल दिव्या’पासून वंचित राहिले. त्यासाठी रिपाइं, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम या मित्रपक्षांनी फडणवीस सरकारला अनेकदा इशारेही दिले, मात्र भाजपने ते कधीही गांभीर्याने घेतले नाहीत.

अाता विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी म्हणजेच जून महिनाअखेरीस मंत्रिमंडळ विस्तार करून त्यात छाेट्या घटक पक्षांना सामावून घेण्याचा निर्णय महायुतीच्या समन्वय समितीने घेतला अाहे. तसेच महामंडळांवरील नियुक्त्याही करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

काेणाला काय? :
भाजपला ५, शिवसेनेला २, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्षाला प्रत्येकी एक मंत्रिपद दिले जाईल. सध्या ३० जणांच्या मंत्रिपदांत भाजपच्या २०, तर शिवसेनेच्या १० मंत्र्यांचा समावेश आहे.