आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माफी मागा अन्यथा खटला, मुख्यमंत्र्यांची दिग्गींना नाेटीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अापली पत्नी कार्यरत असलेल्या बॅंकेत एसअारए याेजनेचे खाते उघडण्याची सक्ती करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासगी बॅंकेचे भले केले, असा अाराेप करणारे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांना फडणवीस यांनी वकिलामार्फत कायदेशीर नाेटीस बजावली अाहे.
‘बेछूट अाराेप केल्याप्रकरणी दोन आठवड्यांत बिनशर्त माफी मागावी, अन्यथा अब्रुनुकसानीचा खटला भरण्यात येईल,’ असेही नोटिशीत म्हटले आहे. फडणवीस यांचे वकील गणेश सोवानी म्हणाले, ‘सिंह यांनी ट्विटरवरून शनिवारी फडणवीस यांच्यावर टीका केली हाेती. फडणवीस यांच्या पत्नी अमृता कार्यरत असलेल्या वरळी येथील बँकेत एसआरए योजनेअंतर्गत एका कंपनीला खाते उघडण्यास सांगण्यात आले आहे. पत्नी कार्यरत असलेल्या खासगी बँकेला लाभ देण्यासाठीच हा खटाटाेप करण्यात आला अाहे,’ असे सिंह यांनी म्हटले आहे. या टिप्पणीवर फडणवीस यांनी सिंह यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करू, असे सांगितले होते. नोटीस मिळाल्यापासून दोन आठवड्यांच्या आत दिग्विजय सिंह यांनी टि्वटरवर जाहीरपणे बिनशर्त माफी मागावी, अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल’, असे नाेटीसीत बजावले असल्याचे सोवानी यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...