आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cm Fadnavis Demands Modi To Give Bharatratna Awards To Phule

सावित्रीबाई व महात्मा फुलेंना भारतरत्न द्या- फडणवीसांची केंद्र सरकारकडे मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि महान समाज सुधारक महात्मा फुले यांना मरणोत्तर 'भारतरत्न' पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करावा, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. यासोबतच मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही एक पत्र लिहून फुले दांम्पत्याला भारतरत्न पुरस्कार देण्याची शिफारस केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, महात्मा फुले हे एकोणिसाव्या शतकातील एक महान समाज सुधारक होते. शेतक-यांच्या हक्कासाठी त्यांनी अभूतपूर्व लढा दिला. याचबरोबर समाजातून वाईट गोष्टी, प्रथा, परंपरा नष्ट व्हाव्या यासाठी त्यांनी मोठे काम केले आहे. त्यांच्या कार्याने महाराष्ट्र कायमच पुरोगामी विचारांनी कार्यरत राहिला. सावित्रीबाईंच्या कार्याचा गौरव करताना फडणवीस पुढे पत्रात म्हणतात की, देशात स्त्री शिक्षणाचा पाया सावित्रीबाई फुले यांनी रचला. महिलांमध्ये जनजागृती, त्यांचे शिक्षण, जातीप्रथेचे निर्मूलन यासाठी सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुलेंच्या खांद्याला खांदा लाऊन काम केले. त्यामुळे समाज घडविण्यात या दोघांचेही कार्य लक्षात घेता त्यांना 'मरणोत्तर भारतरत्न' पुरस्काराने गौरविण्यात यावे असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधानांकडे मागणी केली आहे.