आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

22 वर्षांनंतर पुन्हा क्रिकेटर होणार देशातील सर्वात महागडा सेलिब्रिटी, विराटची ब्रँड व्हॅल्यू 25% वाढली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कसोटी, वन डे आणि टी-२० या तिन्ही प्रकारांत कर्णधार झाल्यानंतर विराट कोहलीची ब्रँड व्हॅल्यू २५ टक्क्यांनी वाढली आहे. देशातील ब्रँड व्हॅल्यूचा विचार करता शाहरुख खाननंतर विराट दुसऱ्या क्रमांकाचा महागडा सेलिब्रिटी ठरला आहे. एका अहवालानुसार, कर्णधारपदासोबतच सलग सामन्यांमध्ये त्याने केलेली दमदार कामगिरी हे पण ब्रँड व्हॅल्यू वाढण्याचे कारण आहे. विराटचा हा फॉर्म या वर्षीही असाच कायम राहिला तर तो शाहरुखला मागे टाकून सर्वात महागडा सेलिब्रिटी ठरू शकतो.

विराट या अव्वल स्थानी पोहोचला तर २२ वर्षांनंतर ब्रँड व्हॅल्यूच्या अनुषंगाने एक क्रिकेटर सर्वात महागड सेलिब्रिटी ठरेल. १९९५ मध्ये सचिन वर्ल्डटेलसोबत ३० कोटींचा करार करून सर्वात आघाडीवर पोहोचला होता. काॅर्पाेरेट फायनान्स अॅडव्हायझरी ‘डफ अँड फेल्स्प्स’ने याबाबतचा एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. यानुसार, अॉक्टोबर २०१६पर्यंत विराटची ब्रँड व्हॅल्यू ९२ दशलक्ष डॉलर (सुमारे ६१८ कोटी) तर शाहरुखची १३१ दशलक्ष डॉलर (सुमारे ८८० काेटी) होती. यानंतर महेंद्रसिंह धोनी २०९ कोटी रुपये ब्रँड व्हॅल्यूसह ९व्या क्रमांकावर होता. या संस्थेचे संचालक अविरल जैन म्हणाले, विराट सध्या ज्या दमदारपणे खेळत आहे ते पाहता त्याची ब्रँड व्हॅल्यू २५ टक्क्यांनी वाढली आहे. पुढेही ती वाढेल अशी आशा आहे. 
 
कर्णधार झाल्यानंतर विराटचे ही व्हॅल्यू धोनीच्या तुलनेत कित्येक पटीत वेगाने वाढली आहे. २०१६मध्ये विराटकडे १३ ब्रँड होते. त्यांची व्हॅल्यू १०० कोटींहून अधिक होती. सध्या त्याच्याकडे २० हून अधिक ब्रँड्स आहेत. तर धोनी २००७ मध्ये कर्णघार झाला तेव्हा त्याच्याकडे १७ ब्रँड्स होते. अहवालानुसार विराटच्या प्रतिमेमुळे कंपन्यांना अधिक फायदा होत आहे. म्हणून कित्येक ब्रँड त्याला चेहरा बनवू पाहत आहेत. पंजाब नॅशनल बँकेने गतवर्षी सप्टेंबरमध्ये विराटला ब्रँड अॅम्बेसेडर नेमले. 
 
बँकेने तिसऱ्या तिमाहीत (डिसेंबर) आपला नफा २०७ कोटी रुपये झाल्याचे सांगितले. डिसेंबर २०१५मध्ये ते ५१ कोटी होते. गेल्या २३ फेब्रुवारीपासून भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका सुरू होत आहे. यात विराटने ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथ याला कसोटी क्रमवारीत मागे टाकले तर त्याचे ब्रँडसोबतचे करार आणखी वेगाने वाढू शकतील.

एका पुस्तकाने माझे जीवनच बदलले...
विराटने शनिवारी हे छायाचित्र इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले. यात तो ‘आॅटोबायोग्राफी ऑफ ए योगी’ हे पुस्तक दाखवताना दिसत आहे. विराटने लिहिले आहे की, ‘हे माझे सर्वात आवडीचे पुस्तक आहे. जीवनाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोनच या पुस्तकाने बदलून टाकला. ज्या लोकांनी आपले समज आणि विचारप्रणालीस आव्हान देण्याचे धाडस दाखवले त्यांनी हे पुस्तक अवश्य वाचावे.’
बातम्या आणखी आहेत...