आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपघातानंतर काढला मिसेस सीएमचा विमा, फडणवीस यांची ट्विटरवर माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता यांच्या वाहनाला शुक्रवारी अपघात झाला. सुदैवाने यात अमृता यांना काहीही इजा झाली नाही. मात्र, या घटनेतून धडा घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने अापल्या पत्नीचा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेद्वारे दोन लाखांचा अपघाती विमा उतरवला. विशेष म्हणजे अमृता ज्या बँकेत असाेसिएट व्हाइस प्रेसिडेंट पदावर अाहेत, त्याच बँकेत फडणवीस यांनी त्यांचा विमा उतरवला अाहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनी आपल्या वैयक्तिक ट्विटर हँडलरवरून ही माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांसाठी सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेच्या लाभार्थींमध्ये आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही नाव समाविष्ट झाले आहे. शनिवारी सकाळी केलेल्या टिवटमध्ये मुख्यमंत्री म्हणातात, ‘फक्त बारा रुपयांच्या वार्षिक हप्त्यामध्ये आपण पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेद्वारे दोन लाखांचा अपघात विमा उतरवला आहे. नुकताच अॅक्सिस बँकेतून आपल्या मोबाइलवर हा विमा उतरवण्यास आपण इच्छुक आहात का, असा संदेश आला आणि मी फक्त "येस' रिप्लाय दिला.'

ही तर जाहिरातबाजी
फडणवीसांच्या या टि्वटबाबत चांगली चर्चा हाेत असली, तरी या अपघाती घटनेच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारच्या योजनेची जाहिरात केल्याच्या टीकात्मक प्रतिक्रियाही त्यांच्या ट्विटवर उमटल्या अाहेत. शिवाय मुख्यमंत्र्यांनी आपली पत्नी काम करत असलेल्या बँकेतूनच विमा उतरवल्याचे जाहीर करत एकप्रकारे आपल्या पत्नीच्या बँकेचीसुद्धा जाहिरात केल्याची प्रतिक्रिया काहींनी मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर व्यक्त केली आहे.
बातम्या आणखी आहेत...