आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प पूर्ण करणारच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निश्चय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत पूर्ण केला जाईल, असा दृढनिश्चय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवला. विशेष म्हणजे राज्य सरकारमध्ये सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेचा या प्रकल्पाला विरोध आहे.

राज्यातील मावळत्या सरकारने हा प्रकल्प सुरू केला. विशिष्ट टप्प्यापर्यंतचे कामही पूर्ण झाले आहे. आता तो थंाबवला तर राष्ट्राचे नुकसान होईल, असे फडणवीस म्हणाले. भारताला आण्विक ऊर्जेची अधिक गरज असल्याचे सांगून पंतप्रधान जे काही निर्णय घेतात ते देशहिताचेच असतात, असा दावा त्यांनी केला.

फ्रान्स दौ-यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे १७ करार केले त्यात जैतापूर आण्विक प्रकल्पासाठी केलेल्या एका कराराचा समावेश आहे. जैतापूर प्रकल्पामुळे आपले अधिक नुकसान होईल, अशी चिंता शेतक-यांना आहे. या प्रकल्पाविरुद्ध अनेक आंदोलने झालेली आहेत.

१० हजार मेगावॅट वीज
जैतापूर प्रकल्पात फ्रान्सची अरेवा कंपनी अणुभट्ट्या पुरवणार आहे. यामुळे प्रकल्पातून १० हजार मेगावॅट वीजनिर्मिती होऊ शकणार आहे. या प्रकल्पातून जी वीजनिर्मिती होईल तिच्या दरनिश्चितीवरून प्रचंड मतभेद असून त्यामुळे प्रकल्पाची कामे रेंगाळली आहेत.