आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cm Fadnavis Open Offer To Youth Congress President To Join In Bjp

मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या या तरूण नेत्याला दिली भाजपमध्ये येण्याची जाहीर ऑफर!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आपल्या पक्षाची ताकद वाढविण्यासाठी विरोधी पक्षातील नेते फोडणे हे काही नव्हे नाही. एखाद्याला आपल्या पक्षात आणायचे असेल तर वेगवेगळी आमिषे दाखवली जातात, गु्त बैठका घेतल्या जातात व जाळे फेकले जाते. मात्र, एखाद्या नेत्याने ते ही मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षातील जाहीर पक्षप्रवेशाची ऑफर दिल्याचे तुम्ही कधी ऐकले नसेल. पण घडले शुक्रवारी तेही मुंबईत.
एका दैनिकाच्या खासगी कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध पक्षातील नेत्यांना व इतर क्षेत्रातील मान्यवरांना बोलविण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांना एका जाहीर कार्यक्रमात भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली. विश्वजित कदम यांनी भाजपची ऑफर दिल्याबाबत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. मात्र, माझ्या रक्तात काँग्रेस आहे. मी काँग्रेस कधीच सोडू शकत नाही व सोडणार नाही असे सांगितले.
याचे झाले असे की, या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना काही तरूण नेत्यांची मुलाखत घेण्याची विनंती करण्यात आली. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी सोलापूरमधील काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांची मुलाखत घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विश्वजित कदम यांना विचारले की, तुमचे वडील इतकी वर्षे राजकारणात आहेत. सातत्याने निवडून येत आहेत. शैक्षणिक संस्थाही उत्तमरित्या चालवता. मग तुमच्या वडिलांचा नंबर कधी येणार?( मुख्यमंत्रीपदासाठी) यावर विश्वजित म्हणाले, आता माझ्या वडिलांचा नाही माझा नंबर येणार आहे. यावर मुख्यमंत्री म्हणाले, मी तर तुम्हाला मागेच सांगितले होते. पण तुम्ही ऐकले नाही. यावर विश्वजित म्हणाले, मी ऐकले पण वडिलांनी ऐकले नाही. मग तुमच्या वडिलांना आता कोण सांगणार असे सांगत बघा मी तर तुम्हाला ऑफर देतो अशी फटकेबाजी देवेंद्र फडणवीस यांनी केली. यावर विश्वजित कदम यांनी नम्रपणे मुख्यमंत्र्यांचे आभार मानले व सांगितले की, काँग्रेस माझ्या रक्तात आहे. मी कधीच काँग्रेस सोडू शकत नाही व सोडणार नाही.
मुख्यमंत्र्यांनी पंकजा मुंडे व प्रणिती शिंदे यांनाही विचारले प्रश्न.... वाचा पुढे...