आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कटप्पाने का मारल्याचे उत्तर देण्यासाठी बाहुबली दाखवताे, मुख्यमंत्र्यांचा विराेधकांना टाेला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रविवारी विधानसभेत जयंत पाटील यांनी ‘कटप्पाने बाहुबलीला का मारले’ हे जाणून घेण्यासाठी एकनाथ खडसेंच्या घरी गेल्याचा उल्लेख केला होता. तसेच ‘बाहुबलीने तोंड उघडले तर भूकंप होईल म्हणून ते बोलत नाहीत,’ असे सांगत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बोट दाखवले होते.
 
त्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ‘कटप्पाने बाहुबली को क्यों मारा याचे उत्तर मिळाले नसल्याबाबत मला चिट्ठी आली आहे. जीएसटी मंजूर झाल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी मी बाहुबलीचा ‘पार्ट टू’ दाखवायला तयार आहे,’ असा टाेला पाटील यांना लगावला.
 
सोमवारी विधानसभेत जीएसटीच्या तिसऱ्या विधेयकाला मंजुरी देण्यात आली. जीएसटी बिल मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासह सर्व सदस्यांचे अभिनंदन करून अाभार मानले. मुख्यमंत्री म्हणाले, ‘संपूर्ण देशामध्ये अप्रत्यक्ष कराच्या एकसमान पद्धतीकरिता जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर प्रणालीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय देशपातळीवर घेण्यात आला.
 
आज महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यास एकमताने मान्यता देण्यात आली, हा ऐतिहासिक दिवस आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेही मुख्यमंत्र्यांनी विशेष अभिनंदन केले. ‘वस्तू आणि सेवा कर परिषदेसमोर महाराष्ट्र हिताची बाजू मांडून ९९ टक्के मागण्या मंजूर करून घेण्यात अर्थमंत्री यशस्वी ठरले आहेत ’, असेही ते म्हणाले.
 
महापालिकांना नुकसान भरपाई देणारा प्रगत कायदा केल्याने महानगरपालिकांची स्वायत्तता कायम राहिली. जीएसटीमुळे राज्याला फार तर एक-दोन वर्षे भरपाई घ्यावी लागेल, त्यानंतर वाढलेल्या उत्पन्नामुळे राज्याला नुकसान भरपाईची गरज पडणार नाही, असेही त्यांनी सांगितले. राज्य सरकारने नुकतेच वाढवलेले रेडी रेकनरचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे का, असा प्रश्न जयंत पाटील यांनी केला होता.
 
त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, रेडी रेकनरच्या दरावर महापालिका जमिनीवर कर आकारते. परवडणाऱ्या दराच्या घर योजनेवर परिणाम होऊ नये म्हणून फक्त मुंबईतील रेडी रेकनर दराच्या वाढीस एक महिन्याची स्थगिती दिली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
पुढील स्‍लाइडवर वाचा,
- कराचा दहशतवाद संपुष्टात येईल, ‘जीएसटी’च्या चर्चेत अर्थमंत्री मुनगंटीवार यांचा दावा
- प्रगत राज्य तारायचं की बुडवायचं: नारायण राणे
 
बातम्या आणखी आहेत...