आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Survey: भाजपच्या 39 आमदार तर 11 खासदारांचे भवितव्य धोक्यात- CM ची तंबी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार-खासदारांना कामगिरी सुधारा अन्यथा परिणाम भोगायला तयार असा निर्वाणीचा इशारा दिला आहे. - Divya Marathi
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार-खासदारांना कामगिरी सुधारा अन्यथा परिणाम भोगायला तयार असा निर्वाणीचा इशारा दिला आहे.
मुंबई- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पावलावर पाऊल टाकत आहेत. फडणवीस यांनी आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे, आमदार- खासदारांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यास सुरुवात केली आहे. भाजपने केलेल्या नुकत्याच एक सर्व्हेनुसार, 39 आमदारांचे राजकीय भवितव्य धोक्यात असल्याचे समोर आले आहे. तसेच भाजपच्या 23 खासदारांपैकी 11 खासदारांना अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. सोबतच राज्यातील काही मंत्र्यांची कामगिरी खराब आहे त्यांच्यासह आमदार-खासदारांना फडणवीस यांनी तंबी देत कामगिरी सुधारण्याचा सल्ला दिला. कामगिरी सुधारा नाहीतर परिणाम भोगायला तयार राहा अशा इशाराच मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. याबाबत एका इंग्रजी वृत्तपत्राने वृत्त दिले आहे.
 
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला मे महिन्यात तीन वर्षे पूर्ण झाली तर देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यातील सरकारला पुढील महिन्यात तीन वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने भाजपने राज्यात आपले मंत्री, आमदार-खासदार यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी नुकताच प्रदेश भाजपच्या वतीने एक सर्व्हे करण्यात आला. त्यात वरील निष्कर्ष काढण्यात आले आहेत.
 
राज्यात सध्या 288 पैकी विधानसभेत भाजपचे 122 आमदार आहेत. तर 48 पैकी 23 खासदार लोकसभेत आहेत. मात्र, यातील 39 आमदार तर 11 खासदारांची कामगिरी अपेक्षित नसल्याचे समोर आले आहे. 
 
हा सर्व्हे समोर येताच फडणवीस यांनी आपल्या आमदार- खासदारांना कामगिरीत सुधारणा करण्याचा सल्ला दिला आहे. तुम्ही कामगिरी सुधारली नाही तर तुम्हाला फारसे भवितव्य नाही असा सज्जड दमच त्यांनी भरला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला भष्ट्राचार व इतर कारणांनी जनतेने घरचा रस्ता दाखवला आहे. आपण सत्तेत येताना जनतेला आश्वासने दिली आहेत ती पूर्ण करावीच लागतील. जनतेला आपण उत्तर देणे लागतो त्यामुळे चांगले सरकार चालवणे ही माझी जबाबदारी आहे व त्याला तुम्ही सर्वांनी अपेक्षित कामगिरी करून साथ देणे गरजेचे आहे, असेही फडणवीस यांनी आमदारांना सुनावले. विविध नियुक्त्या, बदल्यांत कोणत्याही लोकप्रतिनिधीने हस्तक्षेप करू नये, त्यातील राजकीय हस्तक्षेप व भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही असेही त्यांनी खडसावले.
 
पुढे स्लाईडद्वारे वाचा, अमित शहांनी फडणवीसांना काय दिले आहे 'टार्गेट'...
बातम्या आणखी आहेत...