आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रमजान ईद निमित्त मुख्यमंत्र्यांच्या राज्यातील मुस्लिम बांधवांना शुभेच्छा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- रमजान ईद निमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, रमजानचा पवित्र महिना हा प्रार्थना-साधना, संयम आणि मनाचे आंतरिक पावित्र्य जपण्याचा महिना आहे. उपवासाच्या या पर्वाच्या समाप्तीचा दिवस असणारी ईद प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या मानवतावादी संदेशाचे स्मरण करून देणारी आहे. प्रेषितांना अभिप्रेत असलेल्या विश्वबंधुत्व, सामाजिक सलोखा आणि शांततेच्या तत्वाचे पालन करण्यासोबतच मानवतावादी मुल्यांच्या जपणुकीतून सामाजिक एकात्मता जोपासण्यासाठी हे पर्व महत्त्वपूर्ण आहे.
बातम्या आणखी आहेत...