आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लालपरीला मुख्यमंत्र्यांनी दाखविला हिरवा झेंडा, मोनो ठरणार मुंबईकरांची नवी लाईफलाईन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईत आज दुपारी चारच्या सुमारास देशातील पहिल्या मोनो रेल सेवेचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते थाटात उदघाटन झाले. वडाळा ते चेंबूर या मोनो रेल गाडीला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हिरवा कंदिल दाखविताच उपस्थित मुंबईकरांनी एकच जल्लोष केला. मुख्यमंत्र्यांनी आज मुंबईच्या या नव्या लालपरीला हिरवा कंदिल दाखविला असला तरी मुंबईकर उद्या सकाळी सात वाजल्यापासून यातून प्रवास करू शकणार आहेत.
उद्यापासून रोज सकाळी 7 ते रात्री या वेळेत वडाळा ते चेंबूर यादरम्यान मोनो रेल धावेल. 8.26 किलोमीटर अंतर असलेला हा प्रवास केवळ 15 मिनिटांत पूर्ण होईल. पहिल्या टप्प्यात प्रत्येक 15 मिनिटांना मोनो रेल सुटणार आहे. तसेच यासाठी दिवसभर सहा मोनो रेल सतत ये-जा करतील.