आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरीडॉरच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या, 3 लाख रोजगार निर्मिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- औद्योगिक उत्पादनात प्रथमपासुनच आघाडीवर असणाऱ्या महाराष्ट्रात दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरीडॉरमुळे जागतिक दर्जाची औद्योगिक क्षेत्रे निर्माण होण्यास मदत होणार असून महाराष्ट्र उत्पादन क्षेत्रात आघाडी घेईल, असा विश्वास केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री आनंद शर्मा यांनी व्यक्त केला.
येथील सह्याद्री अतिथीगृहामध्ये राज्य शासन, डीएमआयसी ट्रस्ट आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यात ‘स्टेट सपोर्ट ॲग्रीमेंट आणि शेअर होल्डींग ॲग्रीमेंट’ वर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी मंत्री शर्मा, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उद्योगमंत्री नारायण राणे, उद्योग राज्यमंत्री सचिन अहिर, मुख्य सचिव जे. एस. सहारिया, डीएमआयसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, केंद्रिय सहसचिव तल्लिनकुमार, उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी, सहमुख्य कार्यकारी अधिकारी पी. अनबल्गन उपस्थित होते.
शर्मा म्हणाले, केंद्र शासनाने 2011 मध्ये जाहीर केलेल्या राष्ट्रीय उत्पादकता धोरणाच्या अनुषंगाने जीडीपी विकासातील उत्पादन क्षेत्राचा हिस्सा 16 ते 25 टक्क्यांपर्यंत वाढविण्याच्या ‍दिशेने पावले टाकण्यात येत आहेत. इंडस्ट्रीयल कॉरीडॉरमुळे औद्योगिक शहरांच्या विकासाला चालना मिळणार असून परिणामकारक आणि कार्यक्षम तंत्रज्ञान असणारी परिवहन व्यवस्था, विश्वासार्ह ऊर्जा पुरवठा, कार्यक्षम लॉजिस्टीक यांची जोड मिळेल. भारताला उत्कृष्ट उत्पादनाबरोबर जगभरातील गुंतवणूक आकर्षित करुन घेता येईल आणि देशाचे रुपांतर जागतिक उत्पादन केंद्रामध्ये होईल, असेही शर्मा यांनी सांगितले.
3 लाखापेक्षा जास्त नवीन रोजगार निर्मिती अपेक्षित: मुख्यमंत्री.... वाचा पुढे...