आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CM News Regarding Pateti And Janmashtami Shubhecha

सुरक्षिततेची काळजी घेऊन दहीहांडी साजरी करा- मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छांसह सूचना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- जन्‍माष्‍टमी, दहीहांडीचा सण सुरक्षितरित्या आणि ध्वनी प्रदूषण न करता साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त केले आहे.
मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात ‘जन्‍माष्‍टमी हा श्रीकृष्‍णाचा जन्‍मदिवस. हिंदू धर्मियांसाठी हा सण महत्त्वाचा आहे. या सणाविषयी अनेक आख्यायिका आहेत. त्यानुसार दहीहांडीचा उत्सव साजरा केला जातो. दहीहांडीचा सण यावर्षीही उत्साहात आणि ध्वनी प्रदूषण न करता सुरक्षितरित्या साजरा साजरा करावा’, असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
पारशी नववर्षानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा- देशाच्या उन्नतीतही पारशी समाजाचे मोठे योगदान आहे या या समाजाला हे नववर्ष आनंदाचं, शांततापूर्ण आणि भरभराटीचे जावो अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पारशी नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात ‘पारशी धर्मीय भारतीय संस्कृतीशी एकरूप झालेले आहेत. अत्यंत शांततेत जगणारा आणि परिस्थितीशी जुळवून घेणारा असा हा समाज आहे. देशाच्या उन्नतीतही या समाजाचे मोठे पतेती या दिवसापासूनच पारशी नववर्षाची सुरुवात होते, विचार आणि कृतीमध्ये पावित्र्य जपणारा, तसेच कोणत्याही कार्यात संपूर्णपणे झोकून देण्याची वृत्ती असणाऱ्‍या या पारशी समाजाला हे नववर्ष आनंदाचं जावो’, असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.