मुंबई - ११ वर्षीय दृष्टी हरचंदानीने महाराष्टाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. परंतु त्यांना भेटण्यासाठी तिला बरीच धडपड करावी लागली. सुरक्षेच्या कारणास्तव तिला फडणवीस यांना भेटू दिले गेले नाही. तेव्हा तिने त्यांना पत्र लिहिले. देवेंद्र यांनी मुलाखतीसाठी तिला कार्यालयात बोलावले. वाचा पूर्ण घटनाक्रम.
देवेंद्र
फेसबुकवर म्हणाले
मला काल एक चकित करणारा संदेश मिळाला. मी माझ्या कार्यालयात व्यग्र होतो. मुंबईतील एका शाळेची विद्यार्थिनी दृष्टी हरचंदानी माझी मुलाखत घेऊ इच्छित होती. माझ्या सुरक्षारक्षकांनी तिला कार्यालयात प्रवेश दिला नाही. तेव्हा ितने मला पत्र लिहिले. सोबत फोन क्रमांक व पत्ताही दिला. जेणेकरून तिचे बोलणे माझ्याशीच (मुख्यमंत्री) व्हावे. मी तिचा निश्चय व दृढता पाहून खूप खुश झालो. मी तिला माझ्या कार्यालयात बोलावले. तिने मला एखाद्या प्रगल्भ पत्रकारासारखे प्रश्न विचारले. जसे की मी शिक्षणासाठी काय करणार? वाढत्या किमती तुमचे सरकार कशा रोखणार? असे तिचे प्रश्न होते. दृष्टी व राज्यातील इतर मुलांना चांगले भविष्य देता यावे यासाठी माझे सरकार पूर्ण प्रयत्न करेल.
दृष्टीचे पत्र
प्रिय मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस
तुमच्या सुरक्षा यंत्रणेने मला तुमच्या ऑफिसमध्ये येऊ दिले नाही. माझे पत्र मिळाल्यानंतर तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही मला माझ्या क्रमांकावर 982******7 फोन करा किंवा खालील पत्त्यावर कुणाला तरी पाठवा. जेणेकरून तुम्हीच अधिकृतरीत्या बोलावल्याची खात्री मला पटू शकेल. (मला माझ्या शाळेसाठी तुमची मुलाखत हवी आहे.)
बे - व्ह्यू बिल्डिंग, साऊथ विंग, चौथा मजला. फ्लॅट क्रमांक -२२, मलबार हिल, मुंबई.
धन्यवाद, दृष्टी हरचंदानी (जेबी पेटीट हायस्कूल इयत्ता 5 वी)