आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यापा-यांच्या रडारवर सीएम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘जागो जागो कुंभकर्णी निंदसे बाबा जागो’ आणि ‘जो राम का नही, वो हमारे काम का नही’, अशा घोषणा देत ‘एलबीटी’ला मुंबईतील व्यापा-यांनी गुरुवारी विरोध दर्शवला. गेल्या अठरा दिवसांपासून सुरू असलेला बंद कोणत्याही परिस्थितीत मागे घेण्यात येणार नाही, असा इशारा व्यापा-यांनी दिला.


विशेष म्हणजे या वेळी व्यापा-यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना टार्गेट केले. या वेळी भाजपच्या माजी खासदार जयंतीबेन मेहता, आमदार मंगलप्रभात लोढा, अतुल शहा, मुंबई भाजप अध्यक्ष राज पुरोहीत उपस्थित होते. आझाद मैदानावर हजारो व्यापा-यांनी दिवसभर ठाण मांडले होते. या वेळी झालेल्या सभेत व्यापा-यांनी चव्हाण यांची जोरदार खिल्ली उडवून आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली. व्यापा-यांच्या ‘फाम’ या संघटनेचे नेते मोहन गुरनानी म्हणाले, केंद्र सरकार इन्स्पेक्टर राज संपवण्याच्या विचारात असताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मात्र पुन्हा ते राज्यात आणू पाहत आहेत. कराला आमचा विरोध नाही तर यातील जाचक अटींना आहे. एलबीटी करपद्धत व्यापा-यांना त्रासदायक ठरणार आहे. त्यामुळे आम्ही विरोध करत आहोत. हे लक्षात न घेता सरकार आम्हाला जकातचोर ठरवत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.