आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Cm Prithviraj Chavan Meet Governor Rao At Rajbhavan Today

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यात राष्ट्रपती राजवटीची भाजपची मागणी, खडसेंनी घेतली राज्यपालांची भेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारचा राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा काढून घेत असल्याचे पत्र राष्ट्रवादीच्या विधीमंडळाने नेते अजित पवार यांनी राज्यपाल के. विद्यासागर राव यांना दिले आहे. याचबरोबर अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांनी मंत्रिपदाचे राजीनामे दिले आहेत. दरम्यान, काँग्रेस आघाडीचे सरकार अल्पमतात आल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. यासाठी खडसे व विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे राज्यपाल राव यांची भेट घेऊन तशी मागणी केली. दरम्यान, मुख्यमंत्री चव्हाण राज्यपाल राव यांना राज्यातील सद्य स्थितीची माहिती देण्यासाठी राजभवनवर हजेरी लावली.
राष्ट्रवादी काँग्रेसने काल रात्री काँग्रेससोबतची 15 वर्षाची आघाडी तोडत असल्याचे जाहीर केले होते. त्याचवेळी सध्या पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारचा पाठिंबा काढून घेत असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार अजित पवार यांनी राज्यपाल यांची भेट घेत पाठिंबा काढून घेत असल्याचे पत्र दिले. त्यामुळे पृथ्वीबाबांचे सरकार अल्पमतात आले आहे. सरकार अल्पमतात आल्याने विरोधी पक्ष असलेल्या भाजपने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, राज्यात सध्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. आचारसंहिता चालू असल्याने व नवे सरकार महिन्याभरात तयार होणार असल्याने राज्यपाल काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे आहे. राज्यपाल कायद्यानुसार पृथ्वीराज चव्हाण यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्यास सांगू शकतात. मात्र हा सर्वस्वी निर्णय राज्यपालांचा असतो. सरकार अल्पमतात आल्यास राष्ट्रपती राजवट लागू केल्याची घटना घडलेल्या आहेत. मात्र, निवडणूक प्रक्रिया सुरु असल्याने व नवे सरकार महिन्याभराच्या आत येण्याची शक्यता असल्याने राज्यपाल तशी शिफारस करण्याची शक्यता कमी आहे. राज्यात आणीबाणीची व गुंतागुंतीची स्थिती असेल तर राष्ट्रपतीच्या आदेशाने तसे करता येते. मात्र, राज्यात तशी कोणतेही स्थिती नसल्याने राज्यपाल मुख्यमंत्री चव्हाणांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहण्यास सांगतील अशी शक्यता आहे.