आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीसोबतची आघाडी 3 दिवसांत, चौथ्यांदा सत्तेवर येऊ -मुख्यमंत्र्यांचा विश्वास

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र- मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण)
मुंबई- महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षात येत्या दोन-तीन दिवसात आघाडी होईल तसेच ही आघाडी राज्यात सलग चौथ्यांदा सत्तेवर येईल असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. आघाडी सरकारने मागील 15 वर्षात विशेषत 5 वर्षात जबरदस्त कामगिरी केली आहे. याच जोरावर जनता पुन्हा काँग्रेस विचाराला कौल देईल असेही चव्हाण यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रासह हरयाणा राज्याच्या विधानसभा निवडणूकांचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने आज सायंकाळी जाहीर केला. त्यानंतर मुख्यमंत्री चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस विधानसभेच्या निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे सांगितले. चव्हाण म्हणाले, महाराष्ट्र जनतेने नेहमीच काँग्रेसला साथ दिली आहे. याच जोरावर महाराष्ट्र देशातील आघाडीचे राज्य बनविले आहे. यापुढे राज्य आघाडीवर ठेवायचे असल्यास काँग्रेसला निवडून द्यावे लागेल. याचबरोबर महाराष्ट्र राज्य देशातील इतर राज्यांशी तुलना न करता पुढचे टप्प्यांसाठी काम करणार आहे. याअंतर्गत राज्यात कोणीही उपाशी राहणार नाही, सर्वांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. याचबरोबर सर्वांना दर्जेदार व वाजवी दरात शिक्षण उपलब्ध करून देणे हे आमचे लक्ष्य असेल. पायाभूत सुविधांत भर घालून राज्य अत्याधुनिक बनविण्यास आम्ही प्राधान्य देऊ, असेही चव्हाण यांनी सांगितले.
राष्ट्रवादीशी आघाडीबाबत चर्चा सुरु आहे. काही मोजक्या जागांमुळे बोलणी थांबली होती. मात्र, येत्या तीन दिवसात याबाबत अंतिम निर्णय झालेला असेल. त्यासाठी दोन्ही पक्षांचे वरिष्ठ आघाडी करण्याबाबत ठाम आहेत. आमच्या पक्षाचे उमेदवार लवकरच जाहीर केले जातील असेही चव्हाण यांनी सांगितले. पत्रकारांनी चव्हाण यांना तुम्ही कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहात असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, याबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील. तसेच सर्व जागांसोबत या प्रश्नांचे उत्तरही तुम्हाला दोन-चार मिळेल.