आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cm Prithviraj Chavan Resign As A Chief Minister Of Maharashtra

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीचे संकेत; पृथ्वीराज चव्हाण यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यातील काँग्रेस आघाडी सरकारचा पाठिंबा काढल्यानंतर 24 तासांतच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज तडकाफडकी राजीनामा दिला. मुख्यमंत्री चव्हाण यांनी राजीनामा दिल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यपाल के. विद्यासागर राव हे चव्हाण यांचा राजीनामा स्वीकारणार का याकडे लक्ष असेल.
विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी आज दुपारी राज्यपाल के. विद्यासागर राव यांची भेट घेऊन चव्हाण यांचे सरकार बरखास्त करण्याची मागणी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा काढून घेतल्याने काँग्रेसने व चव्हाण यांनी खुर्चीला चिटकून बसू नये अशी टीका भाजपने केली होती. त्यानंतर चव्हाण यांनी राज्यपालांची भेट घेतली व आज सायंकाळी राजीनामा पाठवून दिला. आता राज्यपाल राजीनामा स्वीकारणार का याकडे लक्ष लागले आहे.