आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • CM Prithviraj Chavan Speech In Mumbai On Reservation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरक्षणातून शिक्षणाचा पाया मजबूत करा - मुख्यमंत्री चव्हाण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘मराठा समाजाला शासकीय नोकरी आणि शिक्षणामध्ये 16 टक्के आरक्षण देऊन राज्य शासनाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या आरक्षणाचा उपयोग शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी केला गेला पाहिजे. मराठा माणसाला देशाच्या आणि जगाच्या व्यासपीठावर ताठ मानेने उभे राहण्याची क्षमता या आरक्षणामुळे प्राप्त होईल,’ असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गुरुवारी एका कार्यक्रमात व्यक्त केला.

आरक्षणाचा निर्णय घेतल्याबद्दल युवराज संभाजीराजे व इतर विविध संघटनांनी मुख्यमंत्र्यांचा मंत्रालयात सत्कार केला. या वेळी ते बोलत होते. मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पवार, सरचिटणीस राजेंद्र कोंढरे, माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष शांताराम कुंजीर आदी उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण ही आनंदाची बाब आहे. विशेष म्हणजे अन्य कोणत्याही समाज घटकाचे आरक्षण कमी करण्याचे सरकारचे धोरणही नव्हते. कुणाच्याही हक्कावर अतिक्रमण न करता अतिरिक्त आरक्षण देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हा निर्णय न्यायालयाच्या पातळीवर टिकण्यासाठी परिपूर्ण तयारी करण्यात आली. यामुळेच हा निर्णय घेण्यास विलंब झाल्याचे ते म्हणाले.

आरक्षण मिळाले तरी केवळ त्यावर अवलंबून न राहता मराठा समाजातील युवकांना कठोर पर्शिमाचा सल्ला द्यावा लागेल. कारण कठोर पर्शिमाला व कष्टाला पर्याय नसल्याचे चव्हाण यांनी सांगितले. या आरक्षणाचा उपयोग करून मराठा समाजाने शैक्षणिक प्रगती केली पाहिजे. आजघडीला मराठा समाजातील एकही आयएएस अधिकारी थेट सेवेने नियुक्त झालेला नाही. मुंबईतील गिरणी कामगार आणि माथाडी कामगारांनी मोठ्या कष्टाने मुंबईची उभारणी केली. परंतु आता काळ बदलला आहे. शिक्षणाचा पाया मजबूत केल्याशिवाय तरणोपाय नाही. यामुळेच समाजाच्या सर्व नेत्यांनी युवा पिढीला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

राज्यात आरक्षणाची सुरवात करणारे छत्नपती रार्जषी शाहू महाराज यांची जयंती आहे. त्यांचा आदर्श ठेऊनच सरकार काम करीत आहे, असे सांगून चव्हाण यांनी हा निर्णय घेण्यासाठी सहकार्य करणारे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री नारायण राणे, राणे समितीचे सर्व सदस्य आणि समाजातील सर्व संघटनांचे नेते व कार्यकर्ते यांचे आभार मानले. हा निर्णय घेताना अन्य समाजाच्या नेत्यांचेही सहकार्य लाभल्याचा उल्लेखही मुख्यमंत्र्यांनी आवर्जून केला.

छायाचित्र : युवराज संभाजीराजे व इतर संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी गुरुवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा सत्कार केला.