आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CM Prithviraj Chavan Sucessed Davos Kolsters Switzerland Visits For Foreign Investments In State

बड्या कंपन्या महाराष्ट्रात येण्यास उत्सुक, दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची उद्योजकांशी चर्चा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दावोस/मुंबई- वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीसाठी दावोस (स्विर्त्झलॅंड) येथे गेलेले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दौ-याचा पहिल्या दिवशी कारगिल इन्कॉर्पोरेटेड ही खाद्यतेल उत्पादक बलाढ्य कंपनी, शीतपेय व मद्यनिर्मिती क्षेत्रातील ‘सॅबमिलर’, जपान एक्स्टर्नल ट्रेड ऑर्गनायजेशन (जेट्रो) आणि ‘झुरिक विमानतळ’ पदाधिकाऱ्‍यांची भेट घेवून सविस्तर चर्चा केली. झुरिक विमानतळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी थॉमस केर्न यांनी नवी मुंबई विमानतळाच्या विकासाबाबत विशेष औत्सुक्य दाखविले आहे.
झुरिक विमानतळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी थॉमस केर्न आणि त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने काल मुख्यमंत्री चव्हाण यांची भेट घेवून महाराष्ट्रातील विविध हवाई वाहतुकविषयक प्रकल्पांमध्ये सहभाग घेण्याबाबत चर्चा केली. झुरिक विमानतळ हा तीन धावपट्टया असलेला आणि ए 380 सारखी मोठी विमाने उतरण्याची क्षमता असलेला अत्याधुनिक विमानतळ आहे. चव्हाण यांनी सुरुवातीला या विमानतळाची पाहणी केली. त्यानंतर झालेल्या चर्चेत त्यांनी शिष्टमंडळाबरोबर महाराष्ट्रातील गुंतवणुकीचा संधींबाबत सविस्तर चर्चा केली.
पुणे, नागपूर आणि नवी मुंबई येथे नव्याने उभारल्या जाणाऱ्या विमानतळांविषयी चव्हाण यांनी माहिती दिली. सागरी किनारा नियंत्रण नियमावली, वन विभाग आणि पर्यावरण विभाग यांची मान्यता मिळालेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीमध्ये झुरिक विमानतळ व्यवस्थापनाने विशेष औसुक्य दाखविले. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया यांनी शिष्टमंडळाला नवी मुंबई विमानतळाच्या भुसंपादन प्रक्रियेबाबत आणि विशेषत: ‘नयना’ (नवी मुंबई एअरपोर्ट इन्फ्लुअन्स नोटीफाईड एरिया) या नव्या मॉडेलविषयी माहिती दिली. झुरिक विमानतळ सध्या जीव्हीके ग्रुपसोबतच्या भागीदारीने बंगळुरु विमानतळाचे व्यवस्थापन पाहत आहे. महाराष्ट्रातील नव्या प्रकल्पांमध्ये आपण गुंतवणूक करु इच्छितो असे थॉमस केर्न यांनी सांगितले.
(छायाचित्र- झुरीक एअरपोर्ट बैठक- झुरीक एअरपोर्टच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठकीच्या वेळी डावीकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, झुरीक एअरपोर्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी थॉमस केर्न, मुख्य आर्थिक अधिकारी डॅनिअल स्कमुस्की, इंटरनॅशनल बिझनेस डेव्हलपमेंटचे मार्टीन फर्नांडेझ)
पुढे वाचा, मुख्यमंत्र्यांनी अजून कोणासोबत केली चर्चा...