आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CM Prithviraj Chavan Worshiping Lord Ganesha On The Occasion Of Ganesh Festival At Varsha

PHOTOS: \'वर्षा\'वर मुख्यमंत्र्यांकडून गणेशाची प्रतिष्ठापना, सपत्निक केली पूजा-अर्चना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र- गणेश चतुर्थीनिमित्त मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व सत्वशीला चव्हाण यांनी आज सकाळी वर्षा निवासस्थानी श्री गणेशाची प्रतिष्ठापना करून मनोभावे पूजा केली. यावेळी त्यांचे नातेवाईक, अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते)
मुंबई- मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या वर्षा या शासकीय बंगल्यावर गणरायाची आज सकाळी दहाच्या सुमारास प्राणप्रतिष्ठापना केली. मुख्यमंत्री चव्हाण यांच्यासह त्यांच्या पत्नी सत्त्वशिला चव्हाण यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यावेळी विविध अधिका-यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र राज्याच्या कल्याणासाठी गणरायाला साकडे घेतले. चव्हाण म्हणाले, महाराष्ट्राला नंबर 1 राज्य ठेवण्याची मागणी मी गणरायाकडे केली आहे. राज्यात ज्या भागात पाऊस पडला नाही तेथे पाऊस पाडून दुष्काळ हटव अशीही मागणी केली. आगामी काळात राज्याचे तुझ्या हातून कल्याण होऊ दे. येथील जनतेला सुख, शांती लाभू दे, कोणतेही संकट आले त्याला धावून जा असे साकडे घातल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देताना मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले की, राज्याला गणेशोत्सवाची गौरवशाली परंपरा आहे. या लौकिकाला साजेशा वातावरणात हा उत्सव साजरा करावा. संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. हा गणेशोत्सव आता महाराष्ट्राचे खास वैशिष्ट्य बनला आहे. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यपूर्व काळात समाजाचे संघटन आणि जागृतीसाठी सुरू केलेल्या या सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप आज बदलले असले तरी त्याचे महत्त्व आजच्या काळात आणि परिस्थितीतही कायम आहे.

टिळकांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये सामान्य जनतेच्या सक्रिय सहभागासाठी हा सण सुरू केला. आजच्या काळात गणेशोत्सवाच्या माध्यमातून अनारोग्य, अनिती, अंधश्रद्धेविरूद्ध लढा द्यावयाचा आहे. त्यासोबतच या उत्सवाच्या काळात कुठलेही गालबोट लागणार नाही, याची काळजी आपणा सर्वांना घ्यावी. ध्वनीप्रदूषणविषयक सर्व कायदे काटेकोरपणे पाळून हा गणेशोत्सव पर्यावरणपूरक वातावरणात साजरा करावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
पुढे छायाचित्राच्या माध्यमातून पाहा, मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर पृथ्वीराज चव्हाण व पत्नी सत्त्वशिला चव्हाण यांनी मनोभावे पूजा केली त्याचे क्षण...