आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेकायदा बांधकामाबाबत कायदा आवश्यक: चव्हाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यातील अनधिकृत बांधकामे हा अत्यंत गंभीर प्रश्न असल्याने यासाठी कायदा करणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी विधानसभेत सांगितले.
त्यासाठी मुंबई पालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 14 जणांची समिती नेमली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यात कितीही पायाभूत सुविधा निर्माण केल्या तरी समस्या उद्भवणार असल्याने इंटिग्रेटेड टाऊनशिपची आवश्यकता असल्याचेही त्यांनी म्हटले. पिंपरी पालिकेच्या -हद्दीतील गावात मोठ्या प्रमाणात झालेले एक लाख 10 हजार अनधिकृत बांधकामे, पालिकेने त्यांना पाठवलेली नोटीस, ही अनधिकृत बांधकामे पाडू नये यासाठी उल्हासनगर पॅटर्न राबवण्याबाबतची लक्षवेधी आमदार विलास लांडे, बापूसाहेब पठारे यांनी मांडली होती.