आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘रिपाइं’ला लवकरच मंत्रिमंडळात स्थान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - युती सरकारचा लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येईल आणि त्यामध्ये रामदास आठवले यांच्या रिपाइंला सामील करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिली.

रिपाइंच्या वतीने चेंबूरमध्ये इंदू मिल स्मारकाच्या विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी फडणवीस बोलत होते.मनमोहन सिंग यांच्या यूपीए सरकारने इंदू मिलची जमीन बाबासाहेबांच्या स्मारकासाठी जाहीर केली. मात्र, जमीन हस्तांतरण करण्याबाबतच्या अडचणी दूर केल्या नाहीत. देण्याची नियत नसली की अशा अडचणी उभ्या केल्या जातात, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे नाव न घेता केला.

स्मारकाच्या आराखड्याबाबत अनेक मतभेद आहेत, ते एकत्रित बसून दूर करण्यात येतील. स्मारकात किरकोळ बदल करण्याची सरकारची तयारी या वेळी फडणवीस यांनी दर्शवली. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मारकातील हिरवळीबाबत दिलेल्या सूचना कायम राहून बदल केले जातील, अशी तंबी मुख्यमंत्र्यांनी आंबेडकरी संघटनांना दिली.

रिपाइंला संधी
युतीच्या सरकारला कोणताही धोका नाही, असे सांगत रामदास आठवले यांच्या पक्षाला लवकरच सत्तेत सहभागी करून घेण्यात येईल, असे फडणवीस यांनी या वेळी सांगितले.
- सामािजक न्याय विभागाच्या वतीने अनुसूिचत जाती, जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकार पुढच्या तीन वर्षात ४५० कोटी रुपये खर्च करण्यात येतील.
- राज्याच्या ग्रामीण भागातील अनुसूिचत जाती, जमातीच्या लोकांसाठी राज्य सरकार दरवर्षी २० हजार घरे बांधणार.
- लंडनमधील ज्या घरात बाबासाहेब राहिले त्या स्मारकात दरवर्षी दोन भारतीय विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय करणार.
- ११ आॅक्टोबर रोजी इंदू मिल उद्घाटनावेळी आम्ही शरीराने हजर नसलो तरी मनाने उपस्थित होतो असे धक्कादायक विधान शिवसेनेचे स्थानिक खासदार राहुल शेवाळे यांनी केले.
- इंदू मिल स्मारकात न्यूयाॅर्क आयलँडच्या धर्तीवर बाबासाहेब आंबेडकर यांचा ३६० फुटाचा स्टॅच्यू आॅफ इक्विटी पुतळा करावा, अशी मागणी या वेळी रिपाइं नेते अविनाश महातेकर यांनी केली.
- काँग्रेसने दलित जनतेला केवळ आश्वासनांवर झुलवत ठेवले, त्यामुळेच बाबासाहेबांना भारतरत्न मिळण्यास ४० वर्षे लागली असा आरोप या वेळी सामािजक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी केला.