आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राणेंच्या राजीनाम्याची बातमी निराधार, मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांनाच झापले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कोकणातील 192 गावांना पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील (इको सेन्सिटिव्ह झोन) म्हणून जाहीर करण्यात आल्यानंतर त्याबाबतची अंमलबजावणी सुरु झाल्यानंतर कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत वनमंत्री पतंगराव कदम आणि कोकणातील नेते व मंत्री नारायण राणे यांच्यातील वादाला मुख्यमंत्र्यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. याचबरोबर राणे यांनी राजीनामा देण्याची धमकी दिली नसून, याबाबतची पत्रकारांनी दिलेली बातमी निराधार असल्याचे सांगितले. पत्रकारांनी याबाबत मुख्यमंत्री चव्हाण यांना याबाबत प्रश्न विचारले असता ते पत्रकारांवरच भडकले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत आम्ही बसतो. तेथील खोटी तुम्हाला कोणीतरी देते आणि तुम्ही निराधार बातम्या छापता. मंत्रिमंडळात जे निर्णय, चर्चा होईल ती तुम्हाला देण्यात येईल, असे संयत भाषेत पण रागाने पत्रकारांनाच झापले.
इको सेन्सिटिव्ह झोन मुद्यावरून उदयोगमंत्री नारायण राणे यांनी मंत्रिमंडळात रूद्रावतार धारण केला होता. पश्चिम घाटाचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारने माधमराव गाडगीळ समितीची स्थापना केली होती. या समितीच्या शिफारशींचा अभ्यास करण्यासाठी सरकारने नंतर डॉ. कस्तुरीरंगन समिती नियुक्त केली होती. या समितीने कोकणातील काही तालुके वगळले होते मात्र सिंधूदुर्ग जिह्यातील विविध तालुक्यातील 192 गावांना संवेदनशील म्हणून जाहीर केले होते. त्यासंदर्भातील अधिसूचना जारी झाल्याने राणेंचा संयम सुटला व त्यांनी मंत्रिमंडळातच आपल्या पक्षातील नेत्यांवर तोफ डागली. कोकणात गाडगीळ व कस्तुरीरंगन समितीच्या शिफारशी लागू केल्यास मी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन बाहेर पडेन. या तरतुदी लागू करण्यासाठी येणा-या अधिका-यांना कोकणात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा त्यावेळी राणेंनी दिला.
जर एवढे करूनही सरकारने हे प्रकरण पुढे रेटले तर कोकणात कायदा न सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर आपण जबाबदार राहणार नाही. या निर्णयाच्या विरोधात मी स्वत: रस्त्यावर उतरेन व आंदोलन करीन, अशीही धमकी राणे यांनी दिली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांना याबाबत आज पत्रकारांनी विचारले असता राणेंनी राजीनाम्याची धमकी दिली नाही असे सांगत हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न चालविला आहे.