आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईच्या सुरक्षेसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
|मुंबई - आठ वर्षांपूर्वी २६ नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सागरी सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येत असून सुरक्षेच्या उपाययोजनांसाठी निधीची कमतरता भासणार नसल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिले. मुंबई हल्ल्यादरम्यान धैर्य दाखवत कर्तव्य बजावून समाजाला मदत करणाऱ्या असामान्य लोकांच्या गौरवपर कार्यक्रमात ते बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले, २६/११ चा हल्ला हा एका हॉटेल किंवा एखाद्या शहरावर नव्हता, तर तो देशावर आणि देशाच्या आर्थिक राजधानीवर झालेला हल्ला होता. सागरी मार्गाने झालेल्या या हल्ल्यानंतर मुंबईच्या आणि राज्यातील समुद्रकिनाऱ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. संपूर्ण मुंबई शहर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आणण्याचा आमचा प्रयत्न असून त्या दृष्टीने पावले उचलली जात असल्याचेही ते म्हणाले. सुरक्षेच्या उपाययोजनांसाठी निधीची कमतरता भासणार नाही, अशी हमी देताना पोलिसांच्या आधुनिकीकरणाबरोबरच सागरी सुरक्षेवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. सागरकवच या उपक्रमाच्या माध्यमातून दर तीन महिन्यांनी सागरी सुरक्षेचा आढावा घेतला जातो. मुंबईतील मच्छीमार बोटींना कलर कोडिंग करण्यात आले असून मच्छीमारांनाही बायोमेट्रिक ओळखपत्रे देण्यात आली आहेत असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरेंचीही आदरांजली
सकाळी मुंबईच्या मरीन ड्राइव्ह परिसरातील पोलिस जिमखाना येथील शहीद स्तंभ स्मारकावर पुष्पचक्र वाहून राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली. या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह पोलिस महासंचालक सतीश माथूर, मुंबई पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर व अनेक वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. शहिदांच्या कुटुंबीयांनीही अभिवादन केले.
बातम्या आणखी आहेत...