आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीएम कोट्यातील घरांच्या वितरणाची कागदपत्रे गहाळ!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुख्यमंत्री कोट्यातील घरे कोणाकोणाला वितरित केली याबाबतची सर्व कागदपत्रे गहाळ झाल्याची माहिती राज्य सरकारतर्फे मंगळवारी उच्च न्यायालयात देण्यात आली. गृहनिर्माण विभागाच्या तब्बल १३०० फाईल्स गहाळ झाल्या असून त्यात मुख्यमंत्री कोट्यातून वितरित केलेल्या घरांच्या फाइल्सचाही समावेश असल्याचे राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
सामाजिक क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तींना त्यांचे मुंबईत घर नसल्यास मुख्यमंत्री कोट्यातील घरांचे वितरण केले जाते. मात्र काही वर्षांपासून वितरण करताना समाजकार्यापेक्षा राजकारण्यांच्या मर्जीतल्या लोकांचा प्राधान्याने विचार केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. याविरोधात सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी गेल्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्या. अभय ओक आणि न्या. रेवती मोहिते - ढेरे यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान सरकारी वकील अॅड. जयेश याग्निक यांनी ही माहिती दिली. मात्र या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात

न्यायालयाचे कारवाईचे आदेश
निवृत्त न्यायमूर्ती पाटील यांच्या चौकशी समितीला १९८२ पासून आतापर्यंत मुख्यमंत्री कोट्यातून वितरित झालेल्या घरांच्या वितरणात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अंतिम अहवाल सादर करण्यासाठी या एकसदस्यीय समितीला ३० एप्रिल २०१५ पर्यंतची मुदत दिली होती. मात्र चौकशीसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे सरकारी यंत्रणेकडून उपलब्ध होत नसल्याने अहवाल पूर्ण होऊ शकलेला नाही. त्यामुळे तोपर्यंत एकापेक्षा अधिक घरे घेतलेल्यांवर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले आहेत. तसेच ज्यांनी अगोदरच घरे विकली असतील त्यांच्याकडून सध्याच्या बाजारभावाने घरांची किंमत वसूल करण्यासही सरकारला बजावले आहे.