आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Coal Allocation Files Missing From Maharashtra Govt Custody: Kirit Somaiya

खाण वाटपाची कागदपत्रे गायब : किरीट सोमय्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कोळसा खाण वाटपप्रकरणी केंद्रीय गुप्तचर विभागाला माहिती पुरवण्यास राज्य शासन चालढकल करत असून या प्रकरणातील शिफारशींच्या फाइल्स गायब केल्या असल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.

2004 ते 2009 मध्ये केंद्र सरकारने निविदा न मागवता केलेल्या 25 कोळसा खाण वाटपाची चौकशी सीबीआय करत आहे. यात महाराष्ट्रातील 12 खाणी आहेत. त्या खाणी संबंधित कंपन्यांना मिळण्याबाबत महाराष्ट्र शासनाने शिफारशी केल्या होत्या. खाण वाटपप्रकरणी शिफारशी करताना कोणते निकष वापरले अशी सीबीआयने राज्य सरकारकडे अनेकदा विचारणा केली, परंतु ती माहिती देण्यास राज्य सरकार टाळाटाळ करत आहे. तसेच शिफारशी संबंधातील सर्व फाइल्स राज्य सरकारच्या दफ्तरातून गायब केल्या. पात्रता नसतानाही महाराष्ट्रातील अनेक कंपन्यांना खाणवाटप झाले होते. महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील सचिव दर्जाचे ए. रामकृष्णन, वी. के. जयरथ आणि वी. के. सावरखांडे या अधिकार्‍यांनी या शिफारशी केल्या होत्या, असे सोमय्या म्हणाले.