आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मांडवी नदीत आणताना अडकले कॅसिनो जहाज; तटरक्षक दलाने केली कामगारांची सुटका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
\'एम. व्ही. लकी सेव्हन\' हे कॅसिनो जहाज. - Divya Marathi
\'एम. व्ही. लकी सेव्हन\' हे कॅसिनो जहाज.
पणजी- 'एम. व्ही. लकी सेव्हन' हे कॅसिनो जहाजातील कामगारांची तटरक्षक दलाकडून सुटका करण्यात आली आहे. हरियाणाचे माजी गृहमंत्री गोपाल गोयल कांडा यांचे 'हे कॅसिनो जहाज आहे. गोव्यात मांडवी नदीत आणताना खराब हवामानामुळे ते तिथेच रूतून राहण्याची घटना रविवारी घडली.
 
जहाजाची कोणी घेतली होती जबाबदारी
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून आपल्या हमीवर हे जहाज बंदरातून मांडवी नदीत आणण्याची जबाबदारी या कंपनीकडून घेण्यात आली होती. गोव्यातील मांडवी नदीत हे जहाज पोहचल्याने मांडवी नदीतील एकूण कॅसिनोंची संख्या 6 वर पोहचली आहे. कॅसिनो हे गोव्याच्या पर्यटनाचे मुख्य आकर्षण ठरू लागले आहे आणि त्यामुळे देशी-विदेशी पर्यटकांच्या झुंडी गोव्याकडे वळत आहेत. विशेषत: विकेंडला शेजारील राज्यांतून मोठ्या प्रमाणात पर्यटक कॅसिनोत खेळण्यासाठी येतात.
 
कोणी दिली कॅसिनोला मान्यता
गोपाल कांडा यांच्या या कॅसिनोला राज्यातील भाजप आघाडी सरकारकडून मान्यता मिळाली आहे. सरकारातील गोवा फॉरवर्ड या घटक पक्षाचा या कॅसिनोला विरोध आहे. काँग्रेसकडूनही भाजप आघाडी सरकारवर टीका करण्यात आली होती. आता मांडवी नदीत हे जहाज अडकल्याने ते बाहेर काढण्यासाठी बरीच कसरत करावी लागणार आहे.
 
मंगळवारपासून पावसाळी अधिवेशन
गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 18 जुलैपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनात मांडवीतील कॅसिनोंवरून विरोधी काँग्रेसकडून भाजप आघाडी सरकारला घेरण्याची व्युहरचना आखण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...