आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Coldplay गायकावर तिरंग्याच्या अवमानाचा आरोप, कॉन्सर्टमध्ये कंबरेला लटकवला राष्ट्रध्वज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - इंटरनॅशनल बँड 'कोल्डप्ले'ने पहिल्यांदाच ग्लोबल फेस्टीव्हल इंडियामध्ये सादरीकरण केले. मात्र या शोमध्ये ब्रिटीश बँडचे लिड सिंगर क्रिस मार्टीनने भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर वायरल होत असून, यात मार्टीन कंबरेला राष्ट्रध्वज अडकवलेला दिसत आहे. मार्टीन ए. आर. रहेमान यांच्यासोबत 'वंदे मातरम' हे गाणे गात होता. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी नेते नवाब मलिन यांनी या मुद्द्यावर भाजप-शिवसेनेला कारवाई करण्याची मागणी केली आहे. कलाकाराची लुंगी डान्स करण्याची इच्छा होती का...
- मलिक म्हणाले ''तो गायक तिरंग्याच्या साह्याने लुंगी डान्स करत होता. यामुळे कोट्यवधी देशवासियांच्या भावना दुखावल्या आहेत. त्या कलाकाराने या चुकीबद्दल ताबडतोब माफी मागावी. स्वतःचे प्रमोशन करण्यासाठी सरकार यासारखे इव्हेंट आयोजित करत आहे.''
- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप-शिवसेनेचे अनेक बडे नेते या कार्यक्रमाला उपस्थीत होते. नरेंद्र मोदींना सुध्दा या कार्यक्रमात सहभागी व्हायचे होते, मात्र ते व्हिडीओ लिंकच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले.
कॉन्सर्टमध्ये उपस्थित होते अनेक बॉलिवूड सेलेब्स
- कार्यक्रमात अमिताभ बच्चन, आलिया भट्ट, रणवीर सिंह, कॅटरीना कैफ, सोनाक्षी सिन्हा, परणीती चोप्रा, अरजित सिंग, अर्जुन रामपाल, सुजान खान तसेच इतर अनेक सेलेब्स उपस्थित होते.
- फॅन्स सोबत बॉलिवूड सेलेब्ससुध्दा 'कोल्डप्ले' विषयी अती उत्साहित होते. मागील दोन दिवसात क्रीस मार्टीनसुध्दा अनेक बॉलिवूड सेलेब्रटीजला भेटले.
पुढील स्लाईडवर पाहा, इतर फोटोज... आणि व्हिडिओ....
बातम्या आणखी आहेत...