आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई-नाशिक महामार्गावर बस-कार अपघातात 4 जणांचा मृत्यू; 2 जण गंभीर जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अपघातग्रस्त कार. - Divya Marathi
अपघातग्रस्त कार.
मुंबई/नाशिक- भिवंडी बायपासवर कार आणि बसची समोरासमोर धडक होऊन कारमधील चार जण जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली. विक्रांत सिंग (२४), नीरज  पांचाळ,  मिहिर उत्तेकर आणि निरव मेहता (२३) अशी मृतांची नावे आहेत. कारमधील सर्वजण हे भिवंडी येथून ठाण्याकडे जात होते. या वेळी मानकोळी गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने समोरून येणाऱ्या ठाणे मनपाच्या बसला धडक दिली. यात चौघांचाही मृत्यू झाला.  
 
असा घडला अपघात
अपघात मोदी हुंडाई वेअर हाउससमोर घडला आहे. मुंबईत गेलेले एक कुटूंब नाशिकला परतत असताना हा अपघात घडला.
- कार अतिशय वेगात होती. महामार्गात तिच्या समोर अचानक बस आल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे.
- त्यानंतर कारचालकाचे नियंत्रण सुटून कार दुभाजकावर आणि बसवर आदळली. कारने अनेक वेळा उलटली. 
- या अपघातात कारचा पुर्णपणे चेंदामेंदा झाला. कारमधील मृतदेहही काढण्यासाठीही बरेच प्रयत्न करावे लागले. 
- बस ठाण्याहून मुंबईला चालली होती. या अपघातात बसमधील सर्व प्रवासी मात्र सुरक्षित राहिले. कारच्या धडकेने बसच्या पुढील भागाचे मात्र नुकसान झाले आहे. 
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि व्हिडीओ
बातम्या आणखी आहेत...