आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेल्वेच्या एसी डब्यात प्रवास आता रंगीत चादरींची उब

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रेल्वेच्या वातानुकूल डब्यात कित्येक वर्षांपासून केवळ एकाच रंगातली पांढरी बेडशीट पुरवली जात हाेती. यापुढे मात्र पश्चिम रेल्वेने वातानुकूल डब्यातील प्रवास कलरफूल करायचे ठरवले अाहे. पांढऱ्या बेडशीटच्या जागी अाता प्रवाशांना रंगीत चादरी पुरवण्यात येणार अाहेत. विशेष म्हणजे या चादरी येरवडा अाणि अाैरंगाबादच्या हर्सूल कारागृहात िशक्षा भाेगणाऱ्या कैद्यांनी बनवल्या अाहेत. गांधी जयंतीपासून मुंबई-जयपूर सुपरफास्ट रेल्वेगाडीत याची सुरुवात करण्यात आली आहे.

सध्या मुंबई – जयपूर या सुपरफास्ट गाडीच्या वातानुकूलित श्रेणींच्या सर्व डब्यात रंगीत चादरी वापरण्यास सुरुवात करण्यात अाली अाहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागामध्ये प्रायाेगिक तत्त्वावर १५ दिवस हा उपक्रम राबवण्यात येत अाहे. प्रवाशांनी या नव्या बदलाचे स्वागत केले अाहे. असाच सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर येत्या १५ दिवसांत त्यात वाढ करण्यात येईल, असे पश्चिम रेल्वेचे सहायक व्यवस्थापक शैलेश गुप्ता यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. तुरुंगातील कैदी अापल्या शिक्षेच्या काळात विविध प्रकारच्या वस्तू तयार करतात. पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात या प्रयाेगासाठी येरवडा अाणि अाैरंगाबादमधल्या जवळपास ४०० ते ४५० कैद्यांनी बनविलेल्या पिवळ्या, लाल रंगसंगतीमधील चादरी खरेदी केल्या अाहेत. चादरी ठेवण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या कागदी पिशव्या अाैरंगाबाद अाणि येरवडा येथे बनविण्यात अाल्या अाहेत.

चादरीचा अाकार घटला : वातानुकूलित डब्यातील चादरी अाकाराने माेठ्या असल्यामुळे त्या बऱ्याचदा खाली लाेळत. तसेच पांढऱ्या चादरी साधारणपणे काेणाच्याही घरी वापरल्या जात नाहीत. याबाबत प्रवाशांच्या तक्रारी लक्षात घेता अगाेदरच्या ५६ इंच चादरीची रुंदी करून ती अाता ३८ इंचांवर अाणण्यात अाली अाहे. त्यामुळे या चादरी बर्थवर व्यवस्थित राहू शकतात. विशेष म्हणजे चादरी ठेवण्याचे पॅकेट्स हे रद्दी वर्तमानपत्राचा कागद वापरून तयार करण्यात अाले अाहेत.

टॅब्लेट करणार प्रतिसादाची नाेंद : काेणताही बदल प्रवाशांना रुचला पाहिजे. यासाठी प्रवाशांकडून प्रतिसाद जाणून घेण्यासाठी कागदी प्रश्नावलीचा वापर न करता टॅब्लेटचा वापर करण्यात येत अाहे. डब्यातील मदतनीस (अटेंडंट) या टॅब्लेटमधील ‘प्रयास’ अॅपद्वारे प्रवाशांच्या प्रतिक्रियांची नाेंद ठेवेल. या प्रिंटेड चादर प्रवाशांच्या पसंतीस उतरली तर अशाच प्रकारच्या चादरी पुरवण्याचा िवचार वरिष्ठ पातळीवर करण्यात येईल, असेही गुप्ता यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...