आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Budgetचे \'पब्लिक ऑडिट\': शेतकर्‍यांना दिलासा, रोजगाराचे काय?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शेरोशायरीने फडणवीस सरकारचा दुसरा अर्थसंकल्‍प सादर केला. यंदाचे वर्ष हे 'शेतकरी स्वाभिमान वर्ष' साजरे करणारे असून 'अर्थसंकल्प' बळीराजाला समर्पित केल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. शेतकरी ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून शेतकऱ्यांसाठी 25 हजार कोटींची तरतूद या अर्थसंकल्‍पात करण्‍यात आली आहे. याचबरोबर राज्य सरकारनेही केंद्रांप्रमाणे पायभूत सुविधांना प्राधान्य दिले. यामुळे राज्याच्या अर्थसंकल्पावर जेटलींची छाप दिसत आहे, भाजपाच्‍या दुस-या अर्थसंकल्‍पावर divyamarathi.com कडे वाचकांच्‍या प्रतिक्रीया येत आहेत. काय म्‍हणतात वाचक..
शेतकर्‍यांसाठी योजनांचा पाऊस... सुधीर मुनगंटीवार यांनी नुकसाच मांडलेल्या अर्थसंकल्पाचा 'शेतकरी' हा केंद्रबिंदू ठरला आहे. राज्यावर दुष्काळाचे ढग दाटले आहे. शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने शेतकर्‍यांना मोठा दिलासा दिला आहे. शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई म्हणून 5 हजार 2 कोटी 82 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
यंदाचा अर्थसंकल्प सर्वसमावेशक- सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया
राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केलेला यंदाचा अर्थसंकल्प सर्वसमावेशक आहे. राज्याची आर्थिक स्थिती गंभीर असताना शेतक-यांसाठी तसेच पायाभूत सोयीसुविधांसाठी ठोस उपाययोजना या अर्थसंकल्पातून करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वच घटकांचा या अर्थसंकल्पात विचार करण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया सामान्य लोकांनी अर्थसंकल्पाबाबत व्यक्त केली आहे.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी (दि. 18) राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया देताना राजीव बर्गे यांनी सांगितले की, राज्यात सुमारे तीन वर्षांपासून सलग दुष्काळ आहे. त्यामुळे शेतक-यांची दयनीय अवस्था आहे. या शेतक-यांना सावरण्यासाठी आणि शेती क्षेत्रासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यासाठीची तब्बल 25 हजार कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पातून करण्यात आली आहे. कृषि क्षेत्रातील संशोधन, समुपदेशन, मार्गदर्शनासाठी ‘दीनदयाळ उपाध्याय कृषी मार्गदर्शन योजना’ सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी 60 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. काही जिल्ह्यांमध्ये कृषि महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहे. वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी रस्त्यांचे जाळे तयार करण्यात येणार आहे. यात रस्त्यांचे दुपरीकरणही करण्यात येणार आहे. राज्यातील रेल्वे प्रकल्पांसाठीही कोट्यवधी रुपयांची तरतूद आहे. निराधार, परितक्त्या महिलांसाठीही विविध उपाययोजना राबविण्यात येणार असून त्याची तरतूद करण्यात आली आहे. अल्पसंख्यांक समाजाच्या प्रगतीसाठीही कोट्यवधी रुपयांची तरतूद आहे. अशा अनेक बाबींचा या अर्थसंकल्पात समावेश करण्यात आली आहे. काही वस्तूंवरील कर वाढविण्यात आला असून, काही वस्तूंवरील कर कमी करण्यात आले आहेत. राज्याची आर्थिक स्थिती पाहता अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी काही कठोर निर्णय घेतल्याचे दिसते असे बर्गे यांनी सांगितले.
युवक म्‍हणतात 'आमच्‍यासाठी काय'
महाराष्‍ट्रात युवकांच्‍या रोजगाराचा प्रश्‍न गंभीर आहे. विदर्भ, मराठवाड्यातील युवक पुणे, मुंबईकडे रोजगाराच्‍या शोधात पायपीट करतात. त्‍यांच्‍यासाठी मात्र विशेष तरतूद नाही. विकासाचे धोरण नाही, अर्थसंकल्‍प कुचकामी आहे.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, अशा आहेत नागरिकांच्‍या प्रतिक्रीया..
बातम्या आणखी आहेत...