आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘महावितरण’च्या कामात समित्यांच्या मदतीने सुधार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महावितरणचा कारभार पारदर्शक चालवला जावा आणि ग्राहकांना चांगली सेवा मिळावी यासाठी विविध समित्या नेमण्याचा शासनाचा विचार आहे. महावितरणला सल्ला देणे, ग्राहकांशी समन्वय राखणे आदी कामे या समित्यांमार्फत केली जातील. त्यामुळे वीज गळतीचे प्रमाण कमी होईल, अशी आशा ऊर्जा विभागातील अधिका-यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केली.

१) नियंत्रण समिती : जिल्हास्तरावर विद्युत वितरण नियंत्रण समिती स्थापन केली जाईल. अध्यक्षपदी पालकमंत्री तर सचिव म्हणून महावितरणचा अधीक्षक अभियंता व सदस्य म्हणून जिल्हाधिकारी, सीईआे, कृषी अधिकारी, आमदार आणि प्रतिष्ठित नागरिक असतील.
२. उपविभागस्तरीय आढावा समिती : तहसीलदाराच्या अध्यक्षतेखालील या समितीत आमदार, जिल्हा परिषद सदस्य आणि प्रतिष्ठित नागरिक असतील.
३. वाहिनी व्यवस्थापन व दक्षता समिती : मोठ्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येणार आहे.