आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Companies Pledge To Invest 24000 Crore In Maharashtra News In Marathi

महागुंतवणूक : विविध 32 कंपन्यांशी सामंजस्य करार; 23,850 कोटींची गुंतवणूक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महाशिवरात्रीच्या दिवशी गुरुवारी राज्यात गुंतवणुकीची महागंगा अवतरली आहे. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाशी झालेल्या विविध क्षेत्रांतील 32 कंपन्यांच्या परस्पर सामंजस्य करारामुळे राज्यात 23,850 कोटींची गुंतवणूक होणार आहे. काही वर्षांत यातून 20 हजारांवर रोजगार निर्मिती होईल.

एका समारंभात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत कंपन्यांच्या सामंजस्य करारावर सहय़ा झाल्या. उद्योग राज्यमंत्री सचिन अहिर, एमआयडीसीचे सीईओ भूषण गगराणी, प्रधान सचिव अपूर्व चंद्रा, उद्योग सचिव जी.एस सहाय व कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सिंधुदुर्गात 11,156 कोटी, र्मसिडीझ बेंझने चाकणमध्ये 1500 कोटी गुंतवणुकीची हमी दिली. एससीए हायजिन नाशकात 753 कोटी गुंतवत आहे.

मराठवाड्यात 2853.81 कोटींची मोठी गुंतवणूक
मराठवाड्यात औरंगाबाद, बीड, जालना व उस्मानाबाद जिल्हय़ांत 2853.81 कोटींची गुंतवणूक होणार असून, 4978 रोजगार निर्मिती होणार आहे. सर्वाधिक गुंतवणूक स्टील निर्मिती क्षेत्रात होणार असून, त्याचा फायदा स्टील निर्मितीचे हब असलेल्या जालना जिल्हय़ाला झाला आहे. बीडमध्ये एकाच प्रकल्पाची गुंतवणूक होणार असली तरी त्यातून 1289 जणांना रोजगार मिळणार आहे.औरंगाबाद जिल्ह्यात सहा कंपन्या 2081 कोटी रुपयांची गुंतवणूक होण्याची होणार आहे. त्यातून 2596 जणांना रोजगार मिळेल. मद्य निर्मिती, वाहनांचे सुटे भाग क्षेत्रातील कंपन्यांनी औरंगाबादला प्राधान्य दिले आहे.

25 मेगा प्रकल्पांना मान्यता
- राज्याने 2005 मध्ये जाहीर केलेल्या औद्योगिक विशाल प्रकल्प धोरणाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यानुसार आतापर्यंत 403 विशाल प्रकल्पांना मान्यता मिळाली. या सर्व प्रकल्पांतील आश्वासित गुंतवणूक 3,21,099 कोटी रुपये असून 3.57 लाख रोजगार मिळणे अपेक्षित आहे.

- यापैकी 114 प्रकल्पांमध्ये उत्पादन सुरू झाले आहे. या प्रकल्पांतर्गत चालू वर्षात 27 फेब्रुवारीपर्यत 25 नवीन विशाल प्रकल्पांना मान्यता देण्यात आली असून प्रकल्पात 9,725 कोटी रुपयांची गुंतवणूक, तर 13,721 रोजगार निर्मिती अपेक्षित असल्याची माहिती या कार्यक्रमात देण्यात आली.