आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Company Toll Discount To The Amount Of State Government

टोल सवलतीची रक्कम कंपनीस देऊ : राज्य सरकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्‍म‍ि छायाचित्र - Divya Marathi
प्रतिकात्‍म‍ि छायाचित्र
मुंबई - शीव-पनवेल महामार्गावरील टोल नाक्यावर छोट्या मोटारींना दिलेल्या सवलतीच्या रकमेची प्रतिपूर्ती करण्याची तयारी राज्य सरकारने दाखवली असून येत्या दोन दिवसांत संबंधित कंपनीचे प्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन निर्णय त्याबाबतचा निर्णय घेऊ, अशी माहिती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे.
काही टोल नाक्यांवर छोट्या मोटारी, स्कूलबस आणि शासकीय वाहनांना टोलमधून सूट देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. त्यामुळे टोल वसुलीवर मोठा परिणाम होत असल्याचे सांगत सायन- पनवेल टोलवेज या कंपनीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सोमवारी झालेल्या सुनावणी दरम्यान टोल वसुलीची रक्कम रोडावल्याचा दावा कंपनीने केला. तर सवलतीच्या रकमेची प्रतिपूर्ती करण्याबाबत जुलै रोजी कंपनीचे प्रतिनिधींसाेबत झालेल्या बैठकीचे इतिवृत्त सरकारतर्फे सादर करण्यात आले. मात्र कोणताही तोडगा निघाल्याने येत्या दोन दिवसात कंपनीसोबत आणखी एक बैठक घेण्याचे सरकारने स्पष्ट केले. यावेळी दिली. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि मुख्य अभियंता उपस्थित राहाणार आहेत.

सरकारच्या या उत्तरानंतर मुख्य न्या. मोहित शहा यांनी २० जुलैपर्यंत सुनावणी तहकुब केली.
छोट्या मोटारींना टोलच्या कक्षेतून वगळून आपण नेमके काय लोकहित साधणार आहात अशी विचारणा उच्च न्यायालयाने यापूर्वी पार पडलेल्या सुनावणी दरम्यान राज्य सरकारला केली होती. तसेच छोट्या मोटारींना टोलच्या कक्षेतून वगळण्याच्या निर्णयाचा पूनर्विचार करण्याची सूचनाही केली होती.