आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहुचर्चित धर्मगुरू राधे मा विरुद्ध मुंबईत गुन्‍हा दाखल; विवाहितेचा केला छळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : राधे मा - Divya Marathi
फाइल फोटो : राधे मा

मुंबई - देशभर लाखो भक्‍त असलेल्‍या आणि स्वत:ला देवीचा अवतार मानणाऱ्या बोरवली येथील राधे मा विरोधात तिच्याच एका भक्त तरुणीने हुंडाविरोधी कायद्यान्‍वये तक्रार दिले आहे. तक्रारीत पीडित महिलेने म्‍हटले, बोरिवलीत मिठाईचा व्यवसाय करणाऱ्या गुप्ता कुटुंबातल्या एका तरुणाशी तिचे लग्न ठरले होते. पण, हे कुटुंब माचे मोठे भक्‍त आहे. त्‍यामुळे त्‍यांनी लग्‍नासाठी राधे माची परवागी घेतली. पण, त्‍यासाठी माझ्या कुटुंबासमोर अनेक मागण्‍या ठेवले. आम्‍ही त्‍यांची पूर्तता केलीही. मात्र, लग्‍नानंतर नवरा आणि त्‍याच्‍या कुटुंबाची हुंड्याची असलेली हाव वाढतच गेली. यात राधे मासुद्धा सासरकडील मंडळीला फूस लावत आहे, असा आरोप तिने केला. त्‍या आधारे राधे मा विरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.

पुढील स्‍लाइडवरवाचा कोण आहे ही राधे मा, कुठून आली...?