मुंबई- बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचा मेकअपमन ग्लॅडविन जेम्स याच्याविरोधात मुंबईतील बांगुरु पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. सिने कॉस्टयूम, मेकअप अॅण्ड हेअर असोसिएशनचे यूनियन लीडर दीपक मारुती यांनी ही तक्रार दाखल केली आहे. ग्लॅडविन जेम्स याने दारुच्या नशेत व्हाट्सअॅप ग्रुपवर धमकी दिल्याचा आरोप दीपक मारुती यांनी केला आहे. या प्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत.
काय आहे ग्लॅडविनवर आरोप?
- दीपक मारुती यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ग्लॅडविन जेम्स मेकअप अॅण्ड हेअर असोसिएशनच्या एका ग्रुपचा सदस्य आहे.
- या ग्रुपमध्ये 256 सदस्य आहेत. 14 सप्टेंबरला दुपारी 3 वाजता ग्लॅडविन हा ग्रुपवर दीपक मारुतीसोबत चॅट करत होता. ग्लॅडविन दारुच्या नशेत होता. ग्लॅडविन याने दीपकला धमकावले.
- दीपक मारुती याने ग्लॅडविन याच्या चॅटचा स्क्रीनशॉट घेतला आणि त्याच्या विरोधात बांगुर पोलिसांत तक्रार दाखल केली.
- प्रकरण हायप्रोफाइल असल्याने पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्याआधी शहानिशा करून घेतली होती.
- पोलिस पथक शुक्रवारी ग्लॅडविनची चौकशी करण्यासाठी सेट पोहोचले होते.
- दरम्यान, मेकअप असोसिएशनने ग्लॅडविनची अटक करण्याची मागणी केली आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा...शाहिद कपूरचा मेकअप मन ग्लॅडविन जेम्सचे फोटोज...