आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा महिन्यांत प्लास्टिकवर पूर्णपणे बंदी आणून पर्यायी व्यवस्था करणार : मुख्यमंत्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- येत्या सहा महिन्यांत प्लास्टिकवर पूर्णपणे बंदी आणून पर्यायी व्यवस्था करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सांगितले. राष्ट्रीय हरित लवाद व पर्यावरण विभागातर्फे एनसीपीएमध्ये आयोजित पर्यावरण परिषदेच्या उद््घाटनप्रसंगी ते बोलत होते.


फडणवीस म्हणाले, वातावरणात बदल होत आहे. पर्यावरणाचा प्रश्न गंभीर आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी जनतेचा सहभाग महत्त्वाचा आहे. समुद्रातील प्रदूषित पाण्यामुळे अरबी समुद्रकिनारा प्रदूषित होत आहे. यावर उपाय करण्यासाठी पाण्यावर प्रक्रिया करणार असून त्यासाठी पर्यावरण विभागाने काही नियम घालून दिले आहेत. लवकरच पर्यावरण विभागाच्या काही परवानग्या मिळणार आहेत. तीन-चार वर्षात हा प्रकल्प पूर्ण होईल. प्रदूषित पाणी समुद्रात सोडलेले आढळणार नाही.  


मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी मेट्रोचे काम सुरू आहे. मात्र, काही नागरिकांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्याने काम रखडत आहे. मेट्रोचे काम दिवसा करावे, रात्री करू नये, धुळीचा त्रास होतो, इमारतींना तडे जातात असे काही मुद्दे आहेत. जनतेने विकासाला साथ दिली पाहिजे, असेही फडणवीस म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...