आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डोंबिवली एमआयडीसीत कॉम्प्रेसरमध्ये स्फोट; दोन कामगार गंभीर, एकाचा पाय तुटला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- डोंबिवली एमआयडीसीतील अॅल्यूफिन कंपनीत कॉम्प्रेसरचा स्फोट होऊन दोन कामगार जखमी झाले आहेत. एका कामगाराचा पाय तुटला आहे. जखमींना रुग्‍णालयात हलविण्यात आले आहे.

 

डोंबिवली एमआयडीसी फेज 2 मधल्या अॅल्यूफिन कंपनीत सकाळी 9 वाजता स्फोट झाला. कंपनीतल्या कॉम्प्रेसरमध्ये झालेल्या या स्फोटात एक कामगार गंभीर जखमी झाला. राजेंद्र जावळे असे जखमी कामकाराच नाव आहे. दुसर्‍या जखमीचे नाव समजू शकले नाही. दोघांवर  एमआयडीसीतल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 

दरम्यान, डोंबिवली एमआयडीसीत वर्षभरातली ही तिसरी स्फोटाची घटना आहे. यापूर्वी गेल्या वर्षी एमआयडीसीतल्या प्रोबेस कंपनीत भीषण स्फोट झाला होता, तर याच वर्षी ऑगस्ट महिन्यात फेज 2 मधल्याच इंडो अमाईन कंपनीतही स्फोट झाला होता.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... संबंधित घटनेचे फोटो

बातम्या आणखी आहेत...