आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Compromise For Stable Government, Tail Not Put, Uddhav Thackeray Attack On BJP

स्थिर सरकारसाठी तडजोड केली, शेपूट घातले नाही- उद्धव ठाकरे यांचा भाजपवर वार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सत्तेत सहभागी असूनही शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा वाक‌्युद्ध रंगले आहे. सत्तेतील
सहभागावरून दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर शरसंधान करत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख
उद्धव ठाकरे यांनी स्थिर सरकारसाठी तडजोड केली, शेपूट घातले नाही, असे सांगत भाजपवर वार केला; तर बाहेरून पाठिंबा देऊनही स्थिर सरकार ठेवता येते, असा प्रतिवार भाजप नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.
महापालिका निवडणुकीसाठी सौदेबाजी करता यावी यासाठी भाजपवर दबाव टाकण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया भाजपच्या नेत्याने ‘दिव्य मराठी’ला दिली. सतत लढा देत राहाण्यापेक्षा शिवसैनिकांना स्थैर्य आणि शांती मिळावी म्हणून सत्तेत गेलो आहोत. महाराष्ट्र स्थिर ठेवायचा म्हणून तडजोड करीत सत्तेत सहभागी झालो याचा अर्थ शिवसेनेने शेपूट घातलेले नाही असे सांगत त्यांनी नाव न घेता भाजप नेत्यांवर टीका केली. ठाकरे म्हणाले, घर वापसी चांगली आहे. खरी घरवापसी काश्मिरी पंडितांची करावयास हवी.आता केंद्रात मजबूत सरकार आहे त्यामुळे समान नागरी कायदा लागू करा. केवळ मतांसाठी हिंदूंची संख्या वाढवण्याचा सल्ला देऊ नका अशी टीकाही केली.

पुढे वाचा शिवसेना-भाजपत दुरावा का निर्माण झाला ?