आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उसासाठी ठिबक अनिवार्य, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई।औरंगाबाद - राज्यातील ऊस उत्पादक शेतक-यांसाठी यंदाच्या वर्षअखेरपर्यंत ठिबक सिंचन अनिवार्य करण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. सध्या पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जाणवत आहे. काही वर्षांपासूनच्या सततच्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा वापर चतुराईने केल्याशिवाय गत्यंतर नाही. त्यामुळे ऊस उत्पादकांसाठी ठिबक सिंचन अनिवार्य करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याची कडक अंमलबजावणी करणार असल्याचे महाजनउर्वरित. पान १२

यांनी स्पष्ट केले.
नुकतेच इस्रालयला जाऊन आलेले महाजन म्हणाले, इस्रायलमध्ये सर्व पिके ठिबकवर घेतली जातात. तेथे मोठ्या प्रमाणात पिकांची लागवड करण्यायोग्य वातावरण नसतानाही इस्रायलने केवळ ठिबकच्या जोरावर या क्षेत्रात आपले नाव कमावले आहे. एवढेच नव्हे, तर तेथे रस्त्याच्या मधोमध लावलेल्या झाडांसाठीही ठिबकचा वापर होतो. ठिबकमुळे उत्पादनात चांगली वाढ झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. जळगावमध्ये अनेक शेतक-यांनी ठिबकचा वापर सुरू केला असून त्यांना चांगले उत्पादन मिळाले आहे.
उसासाठी पाण्याचे गणित
डॉ. पवार यांनी सांगितले, पारंपरिक पद्धतीने उसाला पाणी दिल्यास पाण्याचा मोठा अपव्यय होतो. या पद्धतीत उसाला एकरी १ कोटी २५ लाख लिटर पाणी द्यावे लागते. याउलट ठिबकने पाणी दिल्यास ५० ते ६० टक्के पाण्याची बचत होते. ठिबक सिंचनात एक एकर उसासाठी ५० लाख लिटर पाणी लागते. कोणत्याही पिकाला देण्यात येणारे पाणी हेक्टर सेंटिमीटर या प्रमाणात मोजतात. एक हेक्टर सेंमी म्हणजे एक लाख लिटर पाणी. ऊस हे मोठ्या प्रमाणात पाणी पिणारे पीक आहे. पारंपरिक पद्धतीत आडसाली उसाला ३४० ते ३५० हेक्टर सेंटिमीटर, तर पूर्वहंगामी उसाला ३०० ते ३२५ हेक्टर सेंमी पाणी लागते. सुरू उसाला २५० ते २७५ हेक्टर सेंमी, तर खोडव्याला २२५ ते २५० हेक्टर सेंमी पाणी लागते.
निर्णयाची कडक अंमलबजावणी होणार
50% अनुदान ठिबक संचासाठी राज्य सरकार ऊस उत्पादकांना देणार
येणारा खर्च : एक एकरसाठी ५५ ते ६० हजार रुपये खर्च येतो. पट्टा पद्धतीत पाच फूट पट्ट्यासाठी एकरी ५५ हजार, तर चार फूट पट्ट्यासाठी ६० हजार खर्च येतो.
एकरी ७५ लाख लिटर पाणी बचत
^ठिबकने पाणी दिल्यास जमिनीतील पाणी व हवेचा योग्य समतोल राहतो. एकरी ७५ लाख लिटर पाणी बचत होेते.
- डॉ. बी. एस. पवार, कृषी विद्यावेत्ता, औरंगाबाद.