आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Concept Of Right To Reject Faddiest, Prakash Ambedkar Critise

राइट टू रिजेक्ट ही फॅडिस्ट कल्पना, प्रकाश आंबेडकर यांची टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - देशातील 15 टक्के मतदार कधीच मतदान करत नाहीत. या लोकांनी नकाराधिकाराचा वापर केला तरी काहीच बदल होणार नाही. त्यामुळे ‘राइट टू रिजेक्ट’चा पर्याय उपलब्ध करुन देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय फॅडिस्ट कल्पना आहे’, अशी प्रतिक्रिया भारिप- बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर शुक्रवारी व्यक्त केली.


पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात शुक्रवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आंबेडकर म्हणाले की, ‘लोकशाही यंत्रणेत सकारात्मक विचार करायचा असतो. राइट टू रिजेक्टचा पर्याय नकारात्मक आहे. उद्या एखाद्याला लोकशाही आवडली नाही, म्हणून पर्याय मागणार का?’, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.


‘राइट टू रिजेक्टचा विचार जसा चुकीचा आहे, तसाच राइट टू रिकॉलची मागणी बाळबोध आहे. राइट टू रिकॉलचे जोपर्यंत कायद्यात रूपांतर होत नाही, तोपर्यंत त्याला काहीच अर्थ नाही. त्यामुळे न्यायालयाने या निर्णयाचा पुनर्विचार करावा. राइट टू रिजेक्ट आणि राइट टू रिकॉल यांची मागणी लोकशाही विरोधी प्रवृत्तींची असून लोकशाही बिघडवण्याचा हा प्रकार आहे, अशी टीका आंबेडकर यांनी कोणाचेही नाव न घेता केली.


महाराष्‍ट्र लोकशाही आघाडीने राज्यातील लोकसभा आणि विधानसभेच्या सर्व जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. 2 ऑक्टोबर रोजी महाराष्‍ट्र लोकशाही आघाडीने मुंबईत विशाल मोर्चाचे आयोजन केले असून आमचा 14 कलमी कार्यक्रम एमडीएफला आगामी निवडणुकीत मोठे यश मिळवून देईल, असा विश्वास आंबेडकर यांनी व्यक्त केला.
काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये योजनांच्या पातळीवर कोणताही फरक नसल्याची टीकाही त्यांनी केली.