आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Condom Shortage At Nasik Create Hiv Infection Fear

कुंभमेळा: नाशकात फक्त 50 हजार कंडोमचा स्टॉक, HIVची भीती, प्रशासनाची ऑर्डर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- 14 जुलैपासून नाशिकमध्ये सुरु होणा-या महाकुंभ मेळ्यात कोट्यावधी लोक सहभागी होण्याची शक्यता आहे. मात्र, या मेळाव्याच्या आधी महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटीने नाशिक परिससरात कंडोम्सची संख्या कमी असल्याचे सांगत एचआयव्ही धोक्याचा संभव असल्याचे म्हटले आहे. एका एनजीओच्या सर्व्हेनुसार, नाशिक शहरात सध्या फक्त 50 हजार कंडोमचा स्टॉक आहे. शहरात प्रत्येक महिन्याला दीड ते दोन लाख कंडोम्सची गरज भासते. मात्र, हा स्टॉक कुंभ मेळाव्यापूर्वीच संपला आहे.
वर्षाला 24 लाख कंडोमची गरज-

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटीचे कार्यक्रम अधिकारी योगेश परदेशी यांच्या माहितीनुसार, नाशिक शहरात सध्या कंडोम्सचा मोठा तुठवडा आहे. एका एनजीओच्या संशोधनानुसार, नाशिकमध्ये 2015 मध्ये 24 लाख कंडोम्सची गरज असल्याचे म्हटले आहे. योगेश यांच्या माहितीनुसार, शुक्रवारी एक बैठक बोलावण्यात आली होती. ज्यात मुख्य कार्यालयाकडून कंडोम्सच्या पुरवठ्याची मागणी करण्यात आली. आरोग्य विभागाच्या प्रपोजल डायरेक्टरने कंडोम्सची मागणी पूर्ण केली जाईल. नाशिकमध्ये सध्या दोन हजार सेक्स वर्कर आहेत. यासोबतच 560 समलैंगिक आणि 70 ट्रान्सजेंडर राहतात. नाशिकमध्ये प्रत्येक वर्षी हजारो परदेशी पर्यटक येतात.