आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Death Anni: ...तर दाभोलकर, पानसरे वाचले असते, साक्षीदाराने केले आहेत खळबळजनक खुलासे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो. - Divya Marathi
फाइल फोटो.
अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे प्रमुख नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला आज (शनिवार) तीन वर्षे पूर्ण झाली. 20 ऑगस्ट 2013 रोजी अज्ञात हल्लेखोराने दाभोळकर यांच्यावर अगदी जवळून गोळ्या झाडल्या होत्या. पुण्यात भल्या पाहाटे ही घटना घडली होती. पण अद्यापही दाभोळकरांचे मारेकरी मोकाट फिरत आहेत. एवढेच नव्हे तर कुणी हत्या केली याची नेमकी माहितीही समोर आलेली नाही.
सनातन संस्थेच्या डॉ. वीरेंद्र तावडेच्या अटकेने डाव्या विचारसरणीचे तीन प्रमुख नेते नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे आणि एमएम कलबुर्गी यांच्या हत्येप्रकरणी महत्त्वाचा धागा सीबीआयच्या हाती आला आहे. या प्रकरणी महत्त्वाची साक्ष देणाऱ्या एका महत्त्वाच्या साक्षीदाराने आपण याप्रकरणी तीन वर्षांपासून माहिती देत होतो, पण पोलिसांनी दुर्लक्ष केले असा दावा केला आहे. या साक्षीदाराचे नाव सुरक्षेच्या कारणामुळे गोपनीय ठेवण्यात आले आहे. त्याने सीबीआयला दिलेल्या जबाबात तीन वर्षे या प्रकरणाचा पाठपुरावा करताना केलेल्या संघर्षाची माहिती दिली आहे.
या साक्षीदाराने डॉ. तावडे आणि त्यांच्या कटाबाबत माहिती समोर आणली. त्याचप्रकारे त्यांनी दाभोलकरांच्या गुन्हेगारांविषयी पोलिसांना वारंवार माहितीही दिली पण कोणीही त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. सीबीआयने मात्र या प्रकरणी माहिती घेत कारवाई केली.
साक्षीदाराच्या मते त्याचे डॉ. तावडे किंवा त्यांच्यासहकाऱ्यांशी असलेल्या संबंधांपेक्षा या सर्व हत्या टाळता आल्या असत्या हा मुद्दा महत्त्वाचा आहे.

पुढील स्लाइड्सवर वाचा, साक्षीदाराने सांगितलेली सर्व माहिती..

Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.